पुरंदरमध्ये होणार साडेचार हजार घरकुले – राज्यमंत्री शिवतारे

पहिल्या टप्प्यातील 2266 घरकुलांना मंजुरी

सासवड- पुरंदर तालुक्‍यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत साडेचार हजार पक्की घरे बांधली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात यातील 2266 घरकुलांना मान्यता देण्यात आली असून त्यासाठी 57 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी गुरोळी येथे बोलताना दिली.

राज्यमंत्री शिवतारे म्हणाले की, आस्करवाडी, पठारवाडी, भिवरी, बोपगाव, चांबळी, जाधववाडी, झेंडेवाडी, काळेवाडी, सोनोरी, वनपुरी, उदाचीवाडी, आंबोडी, सासवड ग्रामीण, दिवे, पवारवाडी, हिवरे, गराडे, थापेवाडी, वारवडी, सोमुर्डी, कोडीत खुर्द, कोडीत बुद्रुक, भिवडी, नारायणपूर, पोखर, गुरोळी, सिंगापूर, कुंभारवळण, देवडी, चिव्हेवाडी, पानवडी, सुपे खुर्द, बोऱ्हाळेवाडी, पिंपळे, बहिरवाडी, घेरा पुरंदर, मिसाळवाडी, केतकावळे, कुंभोशी इत्यादी गावांचा यात समावेश आहे. यावेळी गुरोळी येथे प्रातिनिधिक स्वरुपात लाभार्थ्यांना मंजुरीची पत्र शिवतारे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमात सभापती रमेश जाधव, उपसभापती दत्तात्रय काळे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, ज्योती झेंडे, उपतालुकाप्रमुख महादेव शिंगाडे, शाखाप्रमुख संदीप खेडेकर, पंकज खेडेकर, सुरेश खेडेकर, पोपट खेडेकर, दादा खेडेकर, हिरामण खेडेकर, बाळासाहेब मचाले, ज्ञानदेव खेडेकर, बाला खेडेकर, विक्रांत पवार यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)