Baramati News : यंदाची गुढी, मातृत्वाच्या स्वप्नपूर्तीची! ‘श्री चैतन्य’ने फुलविली १०१ सुखी संसार
Baramati News : श्री चैतन्यचा हा प्रेरणादायी प्रवास बारामतीतून सुरु झाला. तेथील यश आणि रुग्णांचा मिळालेला प्रतिसाद पाहून हा विस्तार पुढे सातारा आणि अहिल्यानगरपर्यत पोहोचला. दर्जेदार उपचार आणि पारदर्शकता यामुळे लोकांचा ओढा वाढत गेला.

वंध्यत्वाच्या अंधकारात जपला मातृत्वाचा ध्यास
‘श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर’चा १२ वर्षांचा यशस्वी प्रवास
बारामती : वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी, रुग्णाचा डॉक्टरांवर असलेला ‘विश्वास’ हीच सर्वात मोठी पावती असते. वंध्यत्वाच्या कठीण प्रवासात अनेक दांपत्यांना आशेचा किरण दाखवणाऱ्या ‘श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरने आपल्या यशस्वी वाटचालीची १२ वर्षे पूर्ण केली आहेत. केवळ उपचार न करता एका सामाजिक भावनेतून काम करणारे म्हणून बुधवार (दि.१८) रोजी श्री चैतन्य टेस्ट ट्युब बेबी सेंटरने महाराष्ट्रभरात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
श्री चैतन्यचा हा प्रेरणादायी प्रवास बारामतीतून सुरु झाला. तेथील यश आणि रुग्णांचा मिळालेला प्रतिसाद पाहून हा विस्तार पुढे सातारा आणि अहिल्यानगरपर्यत पोहोचला. दर्जेदार उपचार आणि पारदर्शकता यामुळे लोकांचा ओढा वाढत गेला. आज पुणे (हडपसर) व सोलापूर येथेही अत्याधुनिक फर्टिलिटी सेवा देणारी केंद्रे दिमाखात उभी आहेत. सर्वसामान्यांना परवडतील, असे जागतिक दर्जाचे IVF, IUI यांसारखे फर्टिलिटी उपचार स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देणे, हेच या केंद्राचे मुख्य वैशिष्ट्य.
१०१ दांपत्यांचे स्वप्न पूर्ण
संस्थेच्या या प्रवासातील सर्वात भावनिक आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे जेव्हा केंद्राला १० वर्षे पूर्ण झाली होती. केवळ व्यावसायिक नफा न पाहता ‘सामाजिक बांधिलकी’ जपत, श्री चैतन्यने १०१ गरजू दांपत्यांना विनामूल्य मातृत्व प्राप्तीचे स्वप्न पूर्ण करून दिले. डॉ. आशिष जळक यांच्या सूचनेनुसार राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे अनेक जोडप्यांचे मातृत्वाचे स्वप्न पूर्ण झाले. ‘ज्यांच्याकडे आर्थिक ओढाताण आहे पण पदराला बाळ हवे आहे, अशांना आधार देणे हे आमचे कर्तव्य आहे, अशी भावना डॉ. आशिष जळक यांनी व्यक्त केली.
लवकरच कोल्हापूर, दौंडला केंद्रे
एका छोट्या रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर झाले असून आई होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो स्त्रियांसाठी ‘श्री चैतन्य’ हे नाव आता विश्वासाचा समानार्थी शब्द बनले आहे. श्री चैतन्यच्या यशाची आणि गुणवत्तेची चर्चा दक्षिण महाराष्ट्र, सोलापूर जिल्ह्यापर्यत पोहोचली आहे. अनेक रुग्ण उपचारासाठी लांबचा प्रवास करून येतात. त्यांचा प्रवास थांबवण्यासाठी आणि त्यांना हक्काचे उपचार मिळवून देण्यासाठी, लवकरच कोल्हापूर, दौंड येथे नवीन केंद्रे सुरु करण्याचा मानस डॉ. आशिष जळक यांनी व्यक्त केला.
हेही वाचा : मोठी बातमी..! धर्म स्वातंत्र्य विधेयक विधानपरिषदेतही मंजूर; अनिल परबांचा सरकारला सवाल





