‘यावेळी लेकीला नाही तर सुनेला निवडून आणुया…”; सुशील हगवणेची ‘ती’ पोस्ट व्हायरल; नेटकरी संतापले….

Vaishnavi Hagavane death case : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अनेक धक्कादायक आणि हादरवणारी माहिती समोर येत आहे. या प्रकरणात कर्नाटक कनेक्शन समोर आले असून, पोलिसांनी कर्नाटक येथील काँग्रेसचे आमदार त्यांचा पुत्र आणि इतर चार जणांना अटक केली आहे. सध्या या प्रकरणाची राज्यभरात चर्चा सुरू आहे. नागरिक देखील या प्रकरणात तीव्र स्वरुपाच्या भावना व्यक्त करत आहेत.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात तिचा सासरा, पती, सासू, दीर आणि नणंद यांना पोलिसांनी अटक केली आहे. या सर्व आरोपींना न्यायालयाने २८ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणातनंतर राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा सुशील हगवणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.
आता सोशल मीडियावर सुशील हगवणेची एक पोस्ट चांगली व्हायरल होत असून, नेटकऱ्यांकडून या पोस्टवर संताप व्यक्त केला जात आहे. सुशील हगवणे याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लेक आणि सुनेबद्दल लिहिलं आहे. त्याच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत.
नेमकी पोस्ट काय?
बारामती लोकसभा मतदार संघासाठी सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात उभ्या होत्या. त्यावेळी सुशील हगवणे सुनेत्रा पवारांचा प्रचार करत होता. ‘यावेळी लेकीला नाही तर सुनेला निवडून आणुया….सूना घराबाहेर पडल्या तर स्वतःचं साम्राज्य पण उभारू शकतात, सूना सुद्धा इतिहास घडवू शकतात हे जगाला दाखवून देऊया…. एक मत सुनेसाठी, अशी पोस्ट सुशील हगवणे याने केली होती. विशेष म्हणजे सुशील हगवणे याने केलेली पोस्ट पोस्ट ३ मे २०२४ रोजीची आहे.
View this post on Instagram
पोस्टसोबत एक फोटो देखील आहे. या फोटोत स्वतः सुशील हगवणे, खासदार सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबेर पाटील दिसत आहेत. सोशल मीडियावर सुशील हगवणेची पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.





