Pune News : पुणे महापालिकेसाठी साडेसात ते साडेनऊ या वेळत ‘इतके’ टक्के झाले मतदान
Updated On:

पुणे : आज पुणे महानगरपालिकेसाठी मतदान प्रक्रिया पार पडत असून, पुणेकर सकाळपासूनच मतदान करण्यासाठी मतदान केंद्रांवर हजेरी लावताना दिसत आहेत. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरूवात झाली असून, सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदान करता येणार आहे. साडेसात ते साडेनऊ या वेळेत किती टक्के मतदान झाले आहे याची आकडेवारी आता समोर आली आहे.
पुणे महापालिका निवडणुकीत साडेसात ते साडेनऊ वाजेपर्यंत एकूण 5.5 टक्के मतदान झाले आहे आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांना घराबाहेर पडून मतदान केंद्रांवर येऊन मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. पुण्यात लोकशाहीचा उत्साहासाठी पुणेकर मतदान केंद्रांवर जात आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वच मतदान केंद्रांबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
टॅग्स:





