प्रभात वृत्तसेवा पुणे – मतदानासाठी मतदान केंद्रामध्ये जाताना मोबाइल फोन नेता येणार नसल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. बरेच लोक चोरून मतदान केंद्रात मोबाइल घेऊन जातात आणि मतदानाचे फोटो-व्हिडिओ काढतात. मात्र, मतदानाच्या गोपनीयतेचा भंग होईल, असे कृत्य केल्यास तातडीने कारवाई केली जाणार आहे.राज्य निवडणूक आयोगाने मतदारांसाठी मतदान केंद्रावर मोबाइल ठेवण्याची कोणतीही सुविधा केलेली नाही. त्यामुळे नागरिकांनीआपला मोबाइल सोबत आणू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मतदानासाठी आवश्यक ओळखपत्र आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट (पारपत्र), वाहनचालक परवाना, छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र सरकार, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र), छायाचित्र असलेले बँकांचे/टपाल कार्यालयाचे पासबुक, पॅनकार्ड, मनरेगा जॉबकार्ड, कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज, खासदार/आमदार/विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र.