Sunetra Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात कालचा दिवस अत्यंत महत्वाचा ठरला. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर उपमुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सर्वानुमते सुनेत्रा पवार यांच्या नावाला पसंती दर्शवली. त्यानुसार आता राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. पण त्यांच्यासमोर मोठी आव्हान देखील उभी ठाकणार असून, त्या आव्हानांचा सामना त्यांना करावा लागणार आहे. अजित पवार हे राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री होते. त्यांच्यासोबत जे काही आमदार आले त्यांना एकसंध ठेवण्याचे महत्वाचे काम अजित पवार यांनी केले. हेच सर्वात मोठं आव्हान सुनेत्रा पवार यांच्यासमोर असणार आहे. अजित पवार यांच्या पश्चात पक्षाला नवी उभारी देणं. महायुतीच्या राजकारणात राष्ट्रवादीची ताकद अबाधित ठेवणं. पक्षातल्या जुन्या जाणत्या नेत्यांसोबत समन्वय साधणं. आगामी काळात पक्षाचा विस्तार करणं. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भातल्या विषया संदर्भात भूमिका स्पष्ट करणं. या आणि अशी काही आव्हाने सुनेत्रा पवार यांच्यासमोर असणार आहे. त्यामुळे त्या आव्हाने कशा पद्धतीने हाताळू शकतील, हे पाहणे महत्वाचे असणार आहे. निर्णय घेताना पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा सल्ला घेणे सुनेत्रा पवार यांना गरजेचे असणार आहे. DCM Sunetra Pawar उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी या कठीण क्षणी महाराष्ट्रातील जनतेने दिलेला प्रेमाची साथ हेच माझे बळ आहे. आपल्या विश्वासाच्या जोरावर, दादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने पुढे चालत राहीन, अशी पहिली प्रतिक्रिया एक्सवरून पोस्ट शेअर करत दिली आहे. राष्ट्रीय अध्यक्षा होण्याचा मार्ग सुकर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीच्या गटनेत्या म्हणून सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाची सुत्रे असतील. त्यांना सर्व संवैधानिक अधिकार सोपविण्यात आलेले आहेत. आता त्यांचा पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्षा होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. हेही वाचा : LPG Price Hike : अर्थसंकल्पापूर्वी ग्राहकांना मोठा धक्का; एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ