LPG Price Hike : अर्थसंकल्पापूर्वी ग्राहकांना मोठा धक्का; एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ
LPG Price Hike : देशातील सरकारी ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी हे दर जारी केले आहे.

LPG Price Hike : आज १ फेब्रुवारी (रविवार) रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. मात्र केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. देशभरात आजपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे.
दर महिन्याच्या १ तारखेला एलपीजी गॅसच्या नवीन किंमती जाहीर केल्या जातात. आज १ फेब्रुवारी रोजी एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहेत.
१९ किलो वजनाच्या कमर्शियल म्हणजेच व्यावसायिक गॅसच्या किंमतीत ५० रुपयांची वाढ झाली आहे. आजपासून हे नवीन दर लागू झाले आहे.
हॉटेल्स-रेस्टोरंट्समधील खाद्य पदार्थांचे दर वाढण्याची शक्यता
व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा वापर हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, रस्त्यावरील ढाबे आणि इतर व्यावसायिक आस्थापनांमध्ये केला जातो. त्यामुळे हॉटेल्स-रेस्टोरंट्समधील खाद्य पदार्थांचे दर वाढण्याची भीती आहे.
दरम्यान, सरकारी मालकीच्या तेल विपणन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमतींमध्ये सुधारणा करतात. देशातील सरकारी ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी हे दर जारी केले आहे.
घरगुती गॅसच्या किंमती स्थिर
याआधीही जानेवारी महिन्यात एलपीजी गॅसच्या किंमती वाढल्या होत्या. तेव्हा तर १११ रुपयांची वाढ झाली होती. दरम्यान, व्यावसायिक गॅसच्या किंमती वाढल्या असल्यातरी घरगुती गॅसच्या किंमती स्थिर आहेत. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
आजचे एलपीजी गॅसचे दर
कोलकत्यात व्यावसायिक गॅसची किंमत १८४४.५० रुपये, दिल्लीत १७४०.५० रुपये इतकी झाली आहे. तर मुंबईत १६४२ रुपये असणाऱ्या १९ किलो वजनाच्या एलपीजी गॅसच्या किंमती १६९२ रुपये झाली आहे.
हेही वाचा:
Rohit Shetty House Firing : धक्कादायक! दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या बंगल्यावर गोळीबार






