Mumbai Rain : मुंबईत पावसाचा तिसरा बळी; मनसैनिकांचे ठिय्या आंदोलन, पोलीस आणि कार्यकर्ते भिडले
या घटनेनंतर राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. या दुर्घटनेला ४ ते ५ तास उलटून गेले तरी महापालिकेचा एकही जबाबदार अधिकारी घटनास्थळी न फिरकल्यामुळे नागरिकांसह मनसेचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते.

Mumbai Rain – मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कुर्ल्यात दुर्घटना घडली आहे. कुर्ल्याच्या नौपाडा परिसरात सकाळच्या सुमारास झाडाची फांदी डोक्यात पडल्याने ६३ वर्षीय युनुस कुंदावाला यांचा दुर्दैवी मृत्य झाला आहे.
चेंबूर येथे शाळेच्या स्कूलबसवरती झाड पडल्याने शाळकरी मुलाच्या मृत्यूची घटना ताजी असताना पुन्हा एकदा झाड पडून मुंबईकरांचा जीव गेल्याने मुंबई महापालिकेच्या मान्सूनपुर्व तय्यारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. या घटनेमुळे मुंबई महानगरपालिकेच्या मान्सूनपूर्व तयारीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
माहितीनुसार, कुर्ला पश्चिम येथील कमानी परिसरातील बीएमसी शाळेजवळ असलेल्या गोम्स गाऊन बिल्डिंग परिसरात ही दुर्घटना घडली. रविवारी दुपारच्या वेळी अचानक जोरदार वारे सुटल्याने येथील एक मोठे झाड अचानक शेजारील दुकानावर उन्मळून पडले.
या घटनेची माहिती स्थानिक नगरसेवकांचे स्वीय सहाय्यक रोशन शिंदे यांनी तातडीने मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला दिली. झाड कोसळले तेव्हा कुंदावाला हे दुकानातच हजर होते.
झाडाचा प्रचंड ढिगारा दुकानावर पडल्याने ते त्यात गंभीररीत्या चिरडले गेले. स्थानिक नागरिकांनी मोठ्या शर्थीने त्यांना बाहेर काढून तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.
मनसेचे ठिय्या आंदोलन !
दरम्यान, मनसैनिकांकडून रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन केले. तसेच, मनसे कार्यकर्ते पोलिसांना भिडले. मनसैनिक आंदोलनावर ठाम होते. मनसेचे चांदिवलीचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांच्याकडून कुर्ल्याचा घटनेचा निषेध केला जात आहे. डोक्याचा काळी पट्टी बांधून निषेध व्यक्त केला आहे.
या घटनेनंतर राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. या दुर्घटनेला ४ ते ५ तास उलटून गेले तरी महापालिकेचा एकही जबाबदार अधिकारी घटनास्थळी न फिरकल्यामुळे नागरिकांसह मनसेचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते.




