Ajit Pawar : ‘संविधानाबाबत खोटा नरेटीव्ह सेट होता’; अजित पवारांचा आघाडीवर निशाणा

Ajit Pawar – लोकसभा निवडणुकीच्या वेळी संविधानाबाबत खोटा नरेटीव्ह सेट करण्यात आला होता. मात्र दुर्दैवाने आम्ही त्याला प्रत्युत्तर देऊ शकलो नाही. देशात सर्वच लोक हे संविधानाचा आदर करतात.
मात्र, लोकसभा निवडणुकीत चुकीचा प्रचार करण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. या माध्यमातून अजित पवार यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्य सरकारच्या वतीने आज 26/11 हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना 26/11 हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.
महाराष्ट्राने या हल्ल्यामध्ये चांगल्या दर्जाचे अधिकारी गमावले असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. यावेळी राज्यपाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री देखील उपस्थित होते.
आम्हाला संविधानाबद्दल अतिशय आदर आहे. आम्ही आता संविधान दिनाच्या निमित्ताने संविधानाचे वाचन केले. संविधानाचा भारतातील सर्वांनाच आदर आणि अभिमान असण्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.
मात्र लोकसभेच्या वेळी विरोधकांनी फेक नरेटीव्ह सेट केला असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे. या माध्यमातून अजित पवार यांनी महाविकास आघाडी आघाडीवर टीका केली आहे.





