Shambhuraj Desai : “अति तिथे माती, योग्य संधीची…”; शंभूराज देसाईंचा थेट भाजपवर निशाणा
Shambhuraj Desai : जिल्हा परिषदच्या निकालानुसार साताऱ्यात भाजप 27 जागेवर सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र, बहुमतासाठीचा आवश्यक असलेला आकडा गाठण्यात भाजप अपयशी.
Shambhuraj Desai : जिल्हा परिषद निवडणुकीनंतर साताऱ्याच्या गादीचा मान नेमका कुणाला मिळणार? कारण निकालानंतरच्या त्रिशंकू परिस्थितीमुळे सत्तेची गणितं गुंतागुंतीची झाली. जिल्हा परिषदेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी मॅजिक फिगर गाठताना भाजपची दमछाक होते.
त्याचवेळी भाजपच्या विरोधात पडद्यामागे राष्ट्रवादी आणि शिंदेसेना सत्तेसाठी एकत्र येणार असल्याची चर्चा रंगलीय. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला 27 जागा मिळाल्या आहेत.
तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला 20, शिंदेसेनेला 15 काँग्रेसला 1 तर अपक्षांना 2 जागा आहेत. एकूण 65 सदस्यांच्या जिल्हा परिषदेत बहुमतासाठी राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र आल्यास 33 हा बहुमताचा आकडा गाठणं सहज शक्य आहे. यादरम्यान आता पाटणमधील विजयी सभेत मंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपला अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे.
‘अति केलं तर माणसं योग्य वेळ, संधीची वाट बघत असतात’ Shambhuraj Desai
“पाटणमध्ये मोठे नेते, मंत्र्यांनी येऊन भाषणं केली. पण, जिल्हा परिषदेचा निकाल तपासून बघा. दोन्ही राष्ट्रवादी आणि भाजपा यांची बेरीज काय होते बघा. अति तिथे माती होते, अति केलं तर माणसं योग्य वेळ, संधीची वाट बघत असतात. गणेश नाईक यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने इथं येऊन टांगा पलटी वगैरे सारखं भाष्य करणं योग्य नव्हते’, असे म्हणत शंभूराज देसाईंनी नाव न घेता भाजपचे मंत्री जयकुमार गोरे आणि मंत्री गणेश नाईक यांच्यावर निशाणा साधला.
दरम्यान, साताऱ्यात जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेत राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांची बैठक पार पडली. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी युतीतील दोन्हीही पक्षांमध्ये चर्चा सुरू झाल्या आहेत.
थेट सत्ता स्थापनेसाठी प्राथमिक चर्चा झाली असल्याचे मंत्री मकरंद पाटील आणि शिवसेना मंत्री शंभूराज देसाई यांनीही स्पष्ट केलं आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्तेचा खेळ आणखी रंगण्याची शक्यता आहे. Shambhuraj Desai
हेही वाचा:






