“…तर सहा वर्षांसाठी होणार निलंबन”; चंद्रशेखर बावनकुळे यांचा बंडखोरांना इशारा

Chandrasekhar Bawankule | विधानसभा निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवारांसह भाजपच्या बंडखोरांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र नाराज उमेदवारांना भाजपकडून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी तयारी देखील केली जात आहे. यामुळे आता भाजपचे टेन्शन वाढल्याचे दिसून येत आहे.
यावर आता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बंडखोरांना थेट इशारा दिला आहे. ‘जे उमेदवारी अर्ज परत घेणार नाही, त्यांना सहा वर्षासाठी पक्षातून निलंबित केले जाईल. पुढील सहा वर्ष त्यांच्यासाठी पक्षाचे दारं बंद राहतील आणि कितीही प्रयत्न केले तरी निलंबन मागे होणार नाही,‘ असा थेट इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.
तर दुसरीकडे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि बोरीवली विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी करणारे उमेदवार गोपाळ शेट्टी हे अपक्ष निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचे दिसत आहे. याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी गोपाळ शेट्टी सुद्धा त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतील असा विश्वास व्यक्त केला.





