Amit Thackeray : “…तर तिथेच थांबवा”! अंगाला केमिकल रंग लावलेल्या चिमुकल्यांच्या मदतीसाठी अमित ठाकरेंचा पुढाकार; मनसैनिकांना केलं आवाहन
Amit Thackeray : 'लहान मुलांचं असं शोषण अजिबात होऊ देऊ नका'

Amit Thackeray : अनेक गर्दीच्या ठिकाणी, जत्रा, उत्सव आणि महानगरांतील वर्दळीच्या ठिकाणावर अंगाला व्हाईटर अर्थात पांढरा रंग लावलेले लहान मुले पैसे मिळावे म्हणून तासांतास उभे असल्याचे चित्र दिसत आहे. ही मुले कधी गांधींजींच्या रुपात, कधी सुभाष चंद्र बोस यांच्या रुपात पाहायला मिळतात.
या मुलांच्या अंगाला केमिकल कलर लावून शरीर उघडं ठेऊन करमणुकीचं साधन बनवलं जातं आहे, जे की हे बालकामगार कायद्याचं उल्लंघन आहे. मात्र, आता याच मुलांच्या वेदना अमित ठाकरेंनी जाणून घेत मनसैनिकांसह नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. स्वत: अमित ठाकरे या मुलांचच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.
हे अतिशय भीषण
अमित ठाकरे यांनी गणेशोत्सवातील वर्दळीच्या ठिकाणी पांढरा रंग लावलेल्या एका चिमुकल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. सोबतच त्यांनी ट्वीटमध्ये म्हंटले की, “सध्या गणेशोत्सव सुरू आहे, सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. पण, या सगळ्यात रस्त्यावर एक गोष्ट पाहायला मिळते आहे.
गणेशोत्सव सुरू आहे, सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. पण या सगळ्यात रस्त्यावर एक गोष्ट पाहायला मिळते आहे..
लहान लहान मुलांच्या अंगाला सिल्वर केमिकलचे रंग लावून त्यांना देव किंवा महापुरुषांच्या रुपात उभं केलं जात आहे आणि त्यांच्याकडून भीक मागून घेतली जात आहे. हे अतिशय भीषण आहे!
माझं… pic.twitter.com/d832GkyE6O— Amit Thackeray (@amitrthackeray) September 21, 2026
लहान लहान मुलांच्या अंगाला सिल्वर केमिकलचे रंग लावून त्यांना देव किंवा महापुरुषांच्या रुपात उभं केलं जात आहे आणि त्यांच्याकडून भीक मागून घेतली जात आहे. हे अतिशय भीषण आहे,” असे म्हणत अमित ठाकरेंनी या चिमुकल्या जीवांच भीषण वास्तव समाजासमोर मांडलं आहे.
जिथे असं दिसेल, तिथे ही गोष्ट त्वरित थांबवा
पुढे अमित ठाकरे यांनी मनसैनिकांना आवाहन केले की, “माझं सर्व महाराष्ट्र सैनिकांना आणि नागरिकांना आवाहन आहे, ती लहान मुलं आहेत, निष्पाप आहेत. त्यामुळे आसपास असं काहीही दिसलं, तर ते तिथल्या तिथे थांबवा.
त्या कुटुंबाला जी काही मदत हवी असेल ती आपण आपल्या परीने करू, मी स्वतःसुद्धा त्यांच्या पाठीशी उभा राहीन. पण लहान मुलांचं असं शोषण अजिबात होऊ देऊ नका. हे चित्र आपल्याला बदलायचंच आहे. जिथे असं दिसेल, तिथे ही गोष्ट त्वरित थांबवा,” अशा सूचनाच अमित ठाकरेंनी मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
हेही वाचा:





