“…तर या बीडच्या खासदाराची चड्डीसुद्धा जागेवर राहणार नाही,” पोलिस अधिकाऱ्याला वादग्रस्त पोस्ट करणं भोवलं

Ganesh Munde Transfer | बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. मात्र बीडमधील एका पोलीस अधिकाऱ्याला बजरंग सोनावणेंबाबत पोस्ट करणे चांगले भोवले आहे.
बीडच्या वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक गणेश मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन पोलखोल करणार असा मेसेज केला होता. बीड पोलीस प्रेस ग्रुप नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर गणेश मुंडे यांनी हा मेसेज केला होता. ‘जर मी पत्रकार परिषद घेतली तर या बीडच्या खासदाराची चड्डीसुद्धा जागेवर राहणार नाही’, या आशयाची पोस्ट पोलीस अधिकारी गणेश मुंडे यांनी केली होती.
त्यांचा हा मेसेज चांगलाच व्हायरल झाला होता. यानंतर आता खासदार बजरंग सोनवणे यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे. गणेश मुंडे हे बीडमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते.
पुण्याच्या नियंत्रण कक्षात बदली Ganesh Munde Transfer |
दरम्यान, हा मेसेज व्हायरल झाल्यानंतर खासदार सोनवणे यांनी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करत गणेश मुंडे आणि सह पोलीस निरीक्षक दहिफळे या दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी केली होती. बजरंग सोनवणेंच्या तक्रारीनंतर पोलीस अधिकारी गणेश मुंडे यांची बदली करण्यात आली आहे.
वादग्रस्त पोस्ट केल्या प्रकरणी तडकाफडकी बदली झाल्याचे म्हटलं जात आहे. गणेश मुंडे यांची पुण्याच्या नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. खासदार बजरंग सोनवणे यांनी काही दिवसांपूर्वी बीडमधील पोलीस अधिकाऱ्याच्या चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर व्हॉट्सअप ग्रुपवर ही पोस्ट करण्यात आली होती. Ganesh Munde Transfer |
हेही वाचा:
HMPV virus in India: भारतात आढळला HMPV चा पहिला रुग्ण, लहान बाळाला लागण





