“श्रीं”च्या आगमनाच्या मुहूर्तावर नाट्यगृहे सुरू व्हावीत

पुणे – करोनामुळे गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ सांस्कृतिक चळवळ खंडीत झाली आहे. कलाकारांचा जगण्याचा संघर्ष सुरू असून श्रींच्या आगमनाच्या मुहूर्तावर नाट्यगृहांची आणि ओघाने कलाकार व पडद्यामागील तंत्रज्ञ, कलाकार यांचीदेखील प्रतीक्षा संपावी, असे सिने-नाट्य कलाकार विजय गोखले यांनी गणपत्ती बाप्पाच्या चरणी साकडे घातले.
पडद्यामागील कलाकार असलेले रणजीत सोनावळे यांनी श्रींच्या मूर्तींचा स्टॉल लावला असून, ज्येष्ठ सिने-नाट्य कलाकार विजय गोखले यांच्या हस्ते आणि संवाद पुणे व अखिल भारतीय नाट्य परिषद कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत त्याचे औपचारिक उद्घाटन झाले. यावेळी अशोक सोनावळे, कौस्तुभ सोनावळे, मनोरंजन संस्थचे मनोहर कुलकर्णी आदी उपस्थित होते.
गोखले म्हणाले, “रंगमंचीय अविष्कार बंद असल्याने कलेचे उपासक बॅकस्टेज
कलावंतांनी जगायचे कसे, हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे आहे.’





