Gayatri Datar : ‘लग्न रद्द होणार होतं, एवढचं नाही तर..’; अभिनेत्री गायत्री दातार हिचा मोठा खुलासा
Gayatri Datar : नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री गायत्री दातार हिने मोठा खुलासा केला आहे.

Gayatri Datar : एप्रिल महिन्यात टेलिव्हिजन फेम अभिनेत्री गायत्री दातार हिने लग्न केले. तिचे लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. चाहत्यांनी या नव्या झोडप्याला वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. मात्र, अभिनेत्रीवर लग्न थांबवण्याची वेळ आली होती. नेमकं त्यावेळी काय घडलं होतं, याविषयी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री गायत्री दातार हिने मोठा खुलासा केला आहे.
मुलाखतीत गायत्री दातार हिला विचारण्यात आलं की, ‘तुझ्या लग्नात कोणता लोचा म्हणजे घोळ झालेला का?’ यावर गायत्रीने होकार दिला. ती म्हणाली ‘घोळ कुठे होत नाही. छोट्या-मोठ्या अडचणी तर आल्या. पण अशी समस्या समोर उभी राहिली, ज्यामुळे आमचं लग्न रद्द होणार होतं. लग्न रद्द होणार होतं. एवढंच नाही तर, आई-वडिलांना पत्रिका वाटणं देखील बंद केलं होतं, असा खुलासा अभिनेत्रीने केला.
मित्र धावून आला आणि….
गायत्री म्हणाली “समस्या अनेक आल्या, सर्वात गंभीर समस्या होती एलपीजीची… आम्ही रिसॉर्ट बूक केलं, पत्रिका वाटण्यास सुरुवात केली. पण केटररचा फोन आला आणि तो थेट म्हणाला, आम्हाला जेवणाचं जमणार नाही, कारण आमच्याकडे सिलेंडर नाही. त्यामुळे माझ्या आई वडिलांनी पत्रिका वाटणं देखील बंद केलं होतं. कारण लग्न होणार की नाही, हेच माहिती नव्हतं. जवळपास १५ दिवस हेच सुरु होतं.”
पुढे अभिनेत्री म्हणाली “माझा एक मित्र मदतीसाठी पुढे आला आणि जेवणाची सर्व जबाबदारी त्याने घेतलं. त्यामुळे पुणे येथील भोर जवळ आमचं लग्न मोठ्या थाटात झालं. नाही तर, काही ठराविक लोकांच्या उपस्थितीत लग्न करावं लागलं असतं.”
गायत्री दातार हिने टेलिव्हिजन इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनेता सुबोध भावेसोबत तिने तुला पाहते रे ही मालिकेत मुख्य नायिका म्हणून काम केले आहे. ज्यानंतर ती लोकप्रिय झाली. २७ एप्रिल २०२६ रोजी श्रीकांत चावरे याच्यासोबत पारंपारिक पद्धतीने मोठ्या थाटात गायत्रीचे लग्न झाले.
Sunetra Pawar : अजितदादांचं नाव आणि फोटो वापरू नका; सुनेत्रा पवार असं का म्हणाल्या?






