अभिनेत्री गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री; लवकरच अडकणार विवाहबंधनात

Gayatri Datar | मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी सध्या लग्नबंधनात अडकत आहेत. अलीकडेच अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, अभिनेते आदेश बांदेकर यांचे सुपुत्र सोहम बांदेकर आणि पुजा बिरारी, अभिनेत्री तेजस्वी लोणारी यांनी लग्नगाठ बांधली. यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीच्या नावाचा यात समावेश होणार आहे. ‘तुला पाहते रे’ फेम अभिनेत्री गायत्री दातार लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे.
गायत्री दातारने सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना ही गुडन्यूज दिली आहे. गायत्रीने इंन्टाग्रामवर पोस्ट करत तिचा साखरपुडा झाल्याची गूडन्यूज दिली आहे. सोबतच तिने आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोही शेअर केले आहेत.
View this post on Instagram
‘माझ्या आयुष्यात हिरोची एन्ट्री झाली आहे. माझ्या आयुष्यातील आत्तापर्यंतच्या सर्वोत्तम दिवसांपैकी काही क्षण शेअर करताना मला खूप आनंद होत आहे, ‘असं गायत्री दातारने पोस्टमध्ये म्हटलं आहे. सोबतच तिने 11.12.2025 तारीखही सांगितली आहे. याचदिवशी गायत्रीला बॉयफ्रेंडने प्रपोज केला असून दोघांनी साखरपुडाही उरकला आहे.
गायत्रीचा होणारा पती नेमका कोण?
गायत्रीने या पोस्टमध्ये दोन फोटो शेअर केले आहेत ज्यामध्ये ती आपल्या होणाऱ्या पतीसोबत बसल्याचे दिसत आहे. मात्र यात तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा दिसत नाही. त्याचबरोबर दुसऱ्या फोटोमध्ये गायत्रीच्या बोटामध्ये अंगठी दिसत आहे. त्यामुळे तिचा साखपुडा झाल्याचे स्पष्ट होत आहे. गायत्रीच्या या पोस्टवर चाहत्यांसह अनेक कलाकारांनीही भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. गायत्रीचा होणारा पती नेमका कोण आहे? याबाबत अद्याप काही माहिती समोर आली नाही. Gayatri Datar |
दरम्यान, ‘तुला पाहते रे’,’अबीर गुलाल’ अशा गाजलेल्या मालिकांमधून घराघरात गायत्री दातार पोहचली. याशिवाय टी ‘बिग बॉस मराठी’मध्ये दिसली होती. Gayatri Datar |
हेही वाचा:
‘खूपच गंभीर प्रत्युत्तर…’ ; सीरियातील अमेरिकन सैन्यावरील हल्ल्यानंतर ट्रम्पचा आयसिसला कडक इशारा





