Gayatri Datar: ‘मेहंदी रंगली गं…’ अभिनेत्री गायत्री दातार अडकणार विवाहबंधनात
Gayatri Datar : गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये गायत्रीने चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला होता.

Gayatri Datar: ‘तुला पाहते रे’ या मालिकेतून अभिनेत्री गायत्री दातारला मोठी लोकप्रियता मिळाली. काही दिवसांपूर्वीच तिने श्रीकांत चवरेसोबत फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर आता दोघे विवाहबंधनात अडकणार आहे.
नुकताच तिचा मेहंदीचा कार्यक्रम जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमाला मराठी कलाविश्वातील काही कलाकारसुद्धा उपस्थित होते. गायत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मेहंदीचे सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.
या खास दिवसासाठी गायत्रीने हिरव्या रंगाचा अत्यंत सुरेख ड्रेस परिधान केला होता. तर तिच्या होणाऱ्या पांढऱ्या आणि हिरव्या रंगाचे कपडे परिधान केले होते. ‘मेहंदी रंगली गं…’ असे कॅप्शन देत गायत्रीने या सोहळ्याची एक खास झलक चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
या दोघांची जोडी खूपच सुंदर दिसत असून चाहत्यांनी त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. Gayatri Datar
माझ्या आयुष्यात हिरोची एण्ट्री झाली, असं म्हणत गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये गायत्रीने चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला होता. यावेळी तिच्या हातात साखरपुड्याची अंगठीसुद्धा पहायला मिळाली होती.
गायत्रीच्या होणाऱ्या पतीचं नाव श्रीकांत चवरे असं आहे. त्याने आयआयटी बॉम्बेमधून शिक्षण पूर्ण केल्याचं इन्स्टाग्राम बायोमध्ये लिहिलं आहे. त्याचसोबत तो ड्रोन फोटोग्राफरसुद्धा आहे. श्रीकांतला फिरण्याची आणि फोटोग्राफीची खूप आवड आहे. Gayatri Datar
गायत्री दातारने ‘तुला पाहते रे’ या मालिकेतून पदार्पण करत सुबोध भावेसोबत काम केले. त्यानंतर तिने ‘अबीर गुलाल’ या मालिकेत भूमिका साकारली होती.
हेही वाचा:







