अभिनेत्री ‘गायत्री दातार’चा लॉकडाऊन टाईम!

मुंबई – झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेने कमी कालावधीतच लोकप्रियतेचे सर्व रेकॉर्ड मोडले. मराठी अभिनेत्री गायत्री दातार आणि अभिनेता सुबोध भावे हे या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसून आले होते.
‘तुला पाहते रे’ मालिकेत गायत्रीने साकारलेली ईशा निमकर ही भूमिका चांगलीच भाव खावून गेली. तिची बोलण्याची पद्धत तीचे काही डायलॉग आजही जसेच्या तसे लोकांना आठवतात.
दरम्यान, आत लॉकडाऊन मुळे सिनेसृष्टीतील सर्वच कलाकार आपल्या घरात बसून आहेत. चित्रपटांचे शूटिंग जुलै महिन्यात सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गायत्री देखील घरातच आहे.
नुकतंच तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर लॉकडाऊन दरम्यानचे काही खास फोटो आपल्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये गायत्रीचा अतिशय गोड दिसून येत आहे. ती नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आगामी प्रोजेक्ट विषयी माहिती देत असते.





