बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन ही दोन मुलींची आई असून या लविंग फॅमिली सर्कलमध्ये आता आणखी एक नवीन मेंबर जोडला गेला आहे. या नवीन मेंबरमुळे सुष्मिताची छोटी मुलगी अलिसाह सर्वाधिक आनंदी झाली आहे. तिचा आंनद आणि नवीन मेंबरचा व्हिडिओ सुष्मिताने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
व्हिडिओ शेअर करत सुष्मिताने सांगितले की, माझ्या एका जवळच्या मित्राला मुलगा झाला आहे. अलिसाहला एक भाऊ असावा अशी खूप इच्छा होती. ती इच्छा पूर्ण झाल्याने आता अलिसाहला सर्वाधिक आनंद झाला आहे. या बेबीसाठी ती दररोज देवाकडे प्रार्थना करत होती. तसेच या न्यूबॉर्न बेबीची गॉडमदर बनली असल्याचेही सुष्मिताने खुलासा केला.
अलिसाहबाबत सांगायचे झाल्यास या व्हिडिओत ती न्यूबॉर्न बेबीला खूपच प्रेमाने आपल्या जवळ घेताना दिसते. ती या मुलाला खूपच टक लावून पाहत बाळाच्या छोट्या-छोट्या हात-पाय आणि डोळ्यांबाबत उत्सुकतेने सांगत आपला आनंद व्यक्त करताना दिसते. तसेच ती बाळाच्या एक गोड असा पापा घेते. दरम्यान, सुष्मिता सेनही आपल्या गॉडसनला प्रेमाने घेताना दिसते.