The Kerala Story 2 Trailer : जबरदस्ती धर्मांतर आणि बरंच काही..! ‘द केरळ स्टोरी २’मध्ये नेमकं काय खास? पाहा थरारक ट्रेलर
(The Kerala Story 2 Trailer) ट्रेलरनंतर या चित्रपटाबाबत पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. पहिल्या भागाप्रमाणेच हा सीक्वलही बॉक्स ऑफिसवर आणि सार्वजनिक चर्चेत किती प्रभाव टाकतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

The Kerala Story 2 Trailer : बहुचर्चित आणि वादग्रस्त ठरलेल्या ‘द केरळ स्टोरी‘ या चित्रपटाचा सीक्वल आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘द केरळ स्टोरी २ : गोज बियॉन्ड’ या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला असून, पहिल्या भागाप्रमाणेच दुसऱ्या भागातही गंभीर आणि संवेदनशील विषय हाताळण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सिनेमाच्या ट्रेलरची (The Kerala Story 2 Trailer) सुरुवात एका धक्कादायक संवादाने होते, “अगले २५ सालों में भारत एक इस्लामिक स्टेट में बदल सकता है…” या संवादानंतर कथानक वेगवेगळ्या राज्यांकडे वळते. राजस्थानमध्ये एका कुटुंबाने पोलीस ठाण्यात POCSO अंतर्गत तक्रार दाखल केल्याचे दाखवले जाते.
त्यांचा आरोप असतो की त्यांच्या १६ वर्षांच्या मुलीचे जबरदस्ती धर्मांतर करण्यात आले आहे. येथून पुढे एक वेदनादायी आणि थरारक कथा उलगडताना दिसते. या चित्रपटात राजस्थान, मध्य प्रदेश आणि केरळ या राज्यांतील चार वेगवेगळ्या घटनांवर आधारित कथानक दाखवण्यात आले आहे.
View this post on Instagram
राजस्थान : अल्पवयीन मुलीच्या जबरदस्ती धर्मांतराचा आरोप आणि त्यासंदर्भातील कायदेशीर लढा.
मध्य प्रदेश : एका तरुणीला लग्नाच्या जाळ्यात अडकवून धर्म बदलण्याचा दबाव आणला जातो, अशी कथा.
केरळ : एका मुस्लिम तरुणाकडून हिंदू मैत्रिणीसमोर लिव्ह-इन रिलेशनशिपचा प्रस्ताव ठेवला जातो. मुलगी धर्म बदलण्यास नकार देते आणि त्यानंतर परिस्थिती बिघडत जाते.
View this post on Instagram
हा चित्रपट कामाख्या नारायण सिंह यांनी दिग्दर्शित केला आहे. निर्माता विपुल अमृतलाल शाह आणि त्यांचे बॅनर Sunshine Pictures यांच्या अंतर्गत हा चित्रपट साकारला गेला आहे. चित्रपटात उल्का गुप्ता, अदिती भाटिया आणि ऐश्वर्या ओझा प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाने देशभरात मोठी चर्चा निर्माण केली :
२०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाने देशभरात मोठी चर्चा निर्माण केली होती. कथानकाच्या विषयामुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला असला तरी बॉक्स ऑफिसवर त्याने उल्लेखनीय कामगिरी केली होती. समीक्षक आणि प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या, मात्र व्यावसायिकदृष्ट्या चित्रपट यशस्वी ठरला.
दरम्यान, ‘द केरळ स्टोरी २ : गोज बियॉन्ड’ हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ट्रेलरनंतर या चित्रपटाबाबत पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. पहिल्या भागाप्रमाणेच हा सीक्वलही बॉक्स ऑफिसवर आणि सार्वजनिक चर्चेत किती प्रभाव टाकतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ही बातमी वाचा :
‘द केरला स्टोरी’ फेम अभिनेत्री अदा शर्मा रुग्णालयात दाखल; नेमकं काय आहे कारण?





