भाजीबाजार पूर्ण क्षमतेने सुरू होणार
Updated On:

पुणे – मार्केट यार्डातील फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा विभागातील सर्व व्यापाऱ्यांना दररोज व्यवहार करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे मंगळवारपासून (दि.2) बाजार पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर 10 एप्रिलपासून तिन्ही विभाग बंद होते. त्यानंतर 31 मेपासून बाजार समितीने प्रयत्न करून हे विभाग सुरू केले. बाजार चालविताना काही उपाययोजना केल्या आहेत.
मास्क, सोशल डिस्टन्सिंगबरोबरच गर्दी होऊ नये, यासाठी निम्म्या अडत्यांना व्यवहार करण्यास परवानगी दिली होती. दुसऱ्या दिवशी उर्वरित अर्धे व्यापारी व्यवहार करणार होते. मात्र, दोन दिवस पाहणी केल्यानंतर सर्वांना कामाला बोलविण्याचा निर्णय कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतला आहे.





