अजय देवगणच्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटाचा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार रिलीज

Singham Again Trailer | बॉलीवूड अभिनेता अजय देवगणच्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट धमाल करण्यास सज्ज होणार आहे. या चित्रपटात अजयसह अनेक तगडे कलाकार आहेत. या चित्रपटातील सर्व स्टार्सचे पहिले पोस्टर्स समोर आले आहेत. यानंतर आता या चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.
रोहित शेट्टीने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक खास प्रोमो शेअर करत लिहिले की, ‘सिंघम अगेन’चा ट्रेलर उद्या म्हणजेच 7 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. दरम्यान, रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सची सुरुवात 2011 मध्ये ‘सिंघम अगेन’ चित्रपटाने झाली. 2014 मध्ये ‘सिंघम रिटर्न्स’ आला. त्यानंतर 2018 मध्ये रोहित शेट्टीने रणवीर सिंगसोबत ‘सिम्बा’ बनवला. त्याचा चौथा चित्रपट ‘सूर्यवंशी’ 2021 साली प्रदर्शित झाला, ज्यामध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होता.
Instagram पर यह पोस्ट देखें
अजय देवगण व्यतिरिक्त ‘सिंघम अगेन’मध्ये अनेक मोठ्या स्टार्सची झलक पाहायला मिळणार आहे. अक्षय कुमार, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, करीना कपूर आणि टायगर श्रॉफ देखील या चित्रपटाचा भाग आहेत. ‘सिंघम अगेन’मध्ये अर्जुन कपूर आणि जॅकी श्रॉफ खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे बजेट सुमारे 250 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे अजय देवगणच्या ‘सिंघम अगेन’ची टक्कर कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया 3’सोबत होणार आहे. हे दोन्ही चित्रपट 1 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे आता बॉक्स ऑफिसवर कोणता चित्रपट बाजी मारणार हे पाहावे लागणार आहे.





