Kantara prequel : प्रतिक्षा संपली! या दिवशी कांतारा प्रीक्वलचा ट्रेलर प्रदर्शित होणार! ऋषभ शेट्टीची भूमिका कोणती? वाचून उत्कंठा वाढेल!

Kantara prequel : भारतीय सिनेमा इंडस्ट्रीतील मास्टरपीस सिनेमा ठरलेला कांताराचा प्रीक्वल रिलीजसाठी सज्ज आहे. सिनेमाचा दिग्दर्शक आणि अभिनेता ऋषभ शेट्टीने सिनेमाचं शुटिंग पूर्ण झाल्याचा एक रॅपअप व्हिडीओ शेअर केला होता. यानंतर या सिनेमातील बॅालिवूड अभिनेता गुलशन दैवय्या आणि अभिनेत्री रुक्मिनी वसंत या कलाकारांचा लूक रिव्हील करण्यात आला. आता कांतारा चॅप्टर १ रिलीज होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. २ अॅाक्टोबरला हा सिनेमा रिलीज होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. अशातच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.
२० सप्टेंबर या दिवशी कांतारा चॅप्टर १ चा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. २०२२ मध्ये ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ या सिनेमाने बॅाक्स अॅाफिसवर धुराळा घालत प्रेक्षकांच्या पसंतीची पोचपावती मिळवली. या सिनेमानंतर याचा प्रीक्वल येणार असल्याची घोषणा स्वतः रिषभ शेट्टीने केली होती. याशिवाय या सिनेमाची कथा काय असणार आणि सिनेमात ऋषभ शेट्टी कोणती भूमिका साकारली आहे याचीही माहिती समोर आली आहे.
अमेरिकेनी तिकीट बुकिंग वेबसाईट फॅनट्यांगोने याबाबात माहिती दिली आहे. कांतारा चॅप्टर १ ची कथा ही २०२२ च्या अगोदर ३०० इसवी सनाच्या काळातली असणार आहे. या सिनेमात कदमवंश दाखविण्यात आला आहे. सिनेमाची कथा बनवासीच्या रहस्यमय जंगलात घेऊन जाणारी असणार आहे. या जंगलात दिव्य शक्ती असून येथे देव परंपराची पूजा दाखवण्यात येणार आहे, अशी थोडक्यात कथा असणार आहे.
ऋषभ शेट्टी नागा साधूच्या भूमिकेत
कांतारा चॅप्टर १ सिनेमाचा ट्रेलर येणे बाकी असले तरी सिनेमाचं पोस्टर आणि टीझरने अभिनेता आणि या सिनेमाचा दिग्दर्शक ऋषभ शेट्टीच्या भूमिकेची झलक दाखविण्यात आली. आता या सिनेमात त्याचं रोल काय असणार याविषयी माहिती समोर आली असून तो या सिनेमात एका नागा साधूच्या भूमिकेत ऋषभ दिसणार आहे. तर या सिनेमाची सुरूवात दंतकथेपासून होणार आहे. सिनेमातील अॅक्शन सीनसाठीही प्रचंड मेहनत घेण्यात आली आहे. अॅक्शन सीनसाठी रॅगिग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
हेही वाचा : देशाला मिळाला पहिला ‘स्केटिंग विश्वविजेता’ ; आनंद कुमारने पटकावले सुवर्णपदक, पंतप्रधानांनी केले अभिनंदन





