Dhurandhar 2 : अखेर ठरलं.! ‘या’ दिवशी होणार ‘धुरंधर २’चा ट्रेलर प्रदर्शित; स्वतः रणवीरने केला खुलासा
या चित्रपटाच्या रिलीजबाबत आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे बॉक्स ऑफिसवर मोठी टक्कर टळली आहे.

Dhurandhar 2 : रणवीर सिंह अभिनीत ‘धुरंधर २’ या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर अखेर जाहीर झाला आहे. रणवीर सिंगने आपल्या सोशल मीडियावर एक नवीन पोस्टर शेअर करत चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. या पोस्टरमध्ये तो हातात बंदूक घेतलेल्या दमदार लूकमध्ये दिसत आहे.
निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘धुरंधर २’चा ट्रेलर ७ मार्च रोजी सकाळी ११:०१ वाजता रिलीज होणार आहे. हा चित्रपट हिंदीसह तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाच्या रिलीजबाबत आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे बॉक्स ऑफिसवर मोठी टक्कर टळली आहे. कारण यश याच्या ‘Toxic’ या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे रणवीरच्या चित्रपटाला सोलो रिलीज मिळणार आहे.
ट्रेलर उशिरा का आला? (Dhurandhar 2 )
सुरुवातीला ४ मार्चला ट्रेलर रिलीज होणार अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र निर्मात्यांकडून अधिकृत घोषणा न झाल्याने चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. नंतर काही तांत्रिक कारणे आणि त्या दिवशी असलेल्या चंद्रग्रहणामुळे ट्रेलरचे प्रकाशन पुढे ढकलण्यात आले, अशी माहिती समोर आली. आता मात्र ट्रेलर पूर्णपणे तयार असून त्यात नवीन लोकेशन्स, अॅक्शन सिक्वेन्स आणि कथेतले महत्त्वाचे ट्विस्ट पाहायला मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
‘धुरंधर २’ च्या टीझरला कसा प्रतिसाद? (Dhurandhar 2 )
सुमारे एक महिन्यापूर्वी ‘धुरंधर २’चा टीझर रिलीज झाला होता. हिंदी प्रेक्षकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र टीझरमध्ये नवीन दृश्ये नसल्याने काही चाहत्यांनी नाराजीही व्यक्त केली होती. तरीसुद्धा त्या टीझरला १.८ कोटींपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, ज्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता स्पष्ट दिसते.
Dhurandhar 2
‘धुरंधर’चा पहिला भाग डिसेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित झाला होता. सुरुवातीला चित्रपटाबाबत फारशी चर्चा नव्हती आणि त्यामुळे पहिल्या दिवसाची कमाईही अपेक्षेपेक्षा कमी झाली. मात्र तोंडी प्रसिद्धी (Word of Mouth) मुळे चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आणि काही दिवसांतच तो बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला.
View this post on Instagram
पहिल्या भागात एक गुन्हेगारी जगतातील संघर्ष आणि बदला याभोवती कथा फिरते. या कथेत रहमान नावाच्या भयानक खलनायकाचा प्रभावी ट्रॅक दाखवण्यात आला होता. या भूमिकेत अभिनेता अक्षय खन्ना यांनी दमदार अभिनय केला होता.
चित्रपटात गुन्हेगारी जगतातील सत्तासंघर्ष, विश्वासघात आणि बदला यांची थरारक कथा होती. अॅक्शन सीन्स, डार्क टोन आणि मजबूत अभिनयामुळे प्रेक्षकांनी चित्रपटाला मोठा प्रतिसाद दिला. यामुळे ‘धुरंधर’ हा वर्षातील मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक ठरला.
‘धुरंधर २’ मध्ये काय पाहायला मिळणार?
सिक्वेलमध्ये कथा हमजा या पात्राभोवती फिरणार असल्याचे बोलले जात आहे, ज्याची भूमिका रणवीर सिंग साकारत आहे. या भागात पहिल्या भागातील घटनांचा बदला दिसणार असून, मोठ्या प्रमाणात अॅक्शन , आंतरराष्ट्रीय लोकेशन्स आणि गुन्हेगारी जगतातील नवी सत्ता अशा अनेक गोष्टी दाखवल्या जाणार असल्याची चर्चा आहे.





