‘द ट्रेटर्स’ रियालिटी शोचा चित्तथरारक ट्रेलर रिलीज; २० सेलिब्रिटींचा सहभाग, करण जोहर करणार होस्टिंग

Trailer of ‘The Traitors’ : नुकताच द ट्रेटर्स’ या रिअॅलिटी शो चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. १२ जून २०२५ पासून या शोचे एपिसोड्स प्राइम व्हिडिओ या ओटीटीवर प्रसारित करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या शोचे सूत्रसंचालन प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर करणार आहे.’द ट्रेटर्स’ हा आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय असलेल्या BAFTA आणि Emmy पुरस्कार विजेती रिअॅलिटी शो आहे. या शोमध्ये स्पर्धकांमध्ये विश्वास, धोका, आणि रणनीती यांचा खेळ पाहायला मिळणार आहे.
या रियालिटी शोमध्ये एकूण २० स्पर्धक सहभागी झाले आहेत. हे सर्वजण राजस्थानमधील भव्य सूर्यगड पॅलेसमध्ये एकत्र येतात. त्यांना विविध शारीरिक आणि मानसिक चाचण्यांमधून जावे लागते. यासाठी त्यांना मोठी रक्कम जिंकायची आहे. या स्पर्धकांमध्ये काही ट्रेटर्स विश्वासघात करणारे असतील ज्यांची नावे शोचा होस्ट करण जोहर गुप्त ठेवणार आहे.
दुसरे असतील फेथफुल्स विश्वासू यामधून ट्रेटर्स कोण असतील त्यांना ओळखून बाहेर काढायचे असणार आहे. हा टास्क जर स्पर्धकांनी पूर्ण केला नाही, म्हणजेच ट्रेटर्स शेवटपर्यंत उघड झाले नाहीत तर संपूर्ण बक्षीस ते जिंकतील, असा या स्पर्धेचा नियम असणार आहे.
या शोधमध्ये अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. अंशुला कपूर, अपूर्वा, आशिष विद्यार्थी, उर्फी जावेद, करन कुंद्रा, जन्नत जुबैर, रफ्तार, राज कुंद्रा, माहीप कपूर, निकिता लूथर, एलनाज नोरोजी, लक्षणी मंचू, हे त्यांची नावे आहेत. याशिवाय इतर काही सेलिब्रिटी देखील या शोचा भाग असणार आहेत. या शोच्या चित्तथरारक ट्रेलरमुळे मोठी उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.





