Mandous Cyclone : मेंडोस चक्रिवादळाचा महाराष्ट्राला धोका, ऐन थंडीत राज्यात पाऊस बरसणार

मुंबई – राज्यात काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढलेला असतानाच मेंडोस चक्रीवादळाचा (Mandous Cyclone) धोका महाराष्ट्राला बसण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातून उठणाऱ्या मेंडोस चक्रीवादळाने थैमान घालण्यास सुरूवात केली आहे. 11 ते 14 डिसेंबरदरम्यान राज्यात काही ठिकणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये हवामान खात्याने हाय अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. हे चेन्नईपासून 900 किमी आग्नेयेस जाण्याची शक्यता आहे.
Himachal : खुर्ची एक आणि दावेदार पाच; कॉंग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी चुरस वाढली
राज्यात 11 ते 14 डिसेंबरपर्यंत चक्रीवादळामुळे मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. चक्रीवादळाचा परिणाम नाशिक, खान्देश ओलांडून मध्य प्रदेशाच्या बेतुल, बऱ्हाणपूर, देवास, होशंगाबाद, मांडला व छत्तीसगडच्या काही भागापर्यंत जाणवू शकतो. या पार्श्वभूमीवर तिन्ही राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.





