शिक्षकाने केला विक्रम.! एक एकरात ऊसाचे शंभर टन उत्पादन
Updated On:

कोरेगाव भिमा : शेती क्षेत्रात कायम नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात शिरूर तालुका अग्रेसर आहे. एकेकाळी दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या तालुक्याची वेगळी ओळख तयार करण्यात तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे.
याच तालुक्यात वढू बुद्रुक येथील शरदचंद्र पवार माध्यमिक विद्यालयात शिक्षक पदी नियुक्त असलेल्या सोमनाथ भंडारे सरांनी विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देत देत आपल्या वडिलोपार्जित शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऊसाच्या ८६०३२ या वाणाचे एकरी १०० टन उत्पादन घेऊन शिरूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यात नावलौकिक मिळविला आहे.





