चिंगारीची लोकप्रियता वाढली
Updated On:

बंगळुरू – चिंगारी या ऍपची लोकप्रियता वाढू लागली असून तीन कोटी लोकांनी हे ऍप डाऊनलोड केले असल्याचा दावा या ऍपच्या उत्पादकांनी केला आहे.
चीनमध्ये विकसित झालेले टिकटॉक हे ऍप भारतामध्ये बंद करण्यात आल्यानंतर भारत सरकारने देशातील ऍप निर्मात्या कंपन्या आणि व्यक्तींना ऍप विकसित करण्याचा आग्रह केला आहे. 18 ते 24 वयोगटातील लोक चिंगारी या ऍपचा जास्त वापर करीत आहेत.
विशेष म्हणजे हे ऍप इंग्रजी, स्पॅनिश, हिंदी, बांगला, गुजराथी, मराठी, कन्नड, पंजाबी, मल्याळम, तमिळ, ओडिया, तेलगू या भाषांत उपलब्ध करण्यात आले आहे.





