जेव्हा इंटिमेट सीनमध्ये मिथुन चक्रवर्तीचा संयम सुटला अन् सुष्मिता सेन भडकली …

हिंदी चित्रपटसृष्टीतील डिस्को डान्सर म्हणून ओळखले जाणारे मिथुन चक्रवर्ती यांनी 350 हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय मिथुन यांनी बंगाली, ओरिया आणि भोजपुरी चित्रपटांमध्येही हात आजमावला आहे. त्यांनी फिल्मी करिअरमध्ये अनेक इंटिमेट सीन्स केले. पण एका चित्रपटातील सीन आजही चर्चेत असतो.
मिथुनने त्याच्या एका चित्रपटातील एका सीनदरम्यान भान गमावले आणि असे काम केले की त्याच्या सह-अभिनेत्री त्यांच्यावर चांगल्याच भडकल्या आहे. मिथुन अभिनेत्री सुष्मिता सेनसोबत ‘चिंगारी’ चित्रपटाचे शूटिंग करत असताना ही घटना घडली आणि दोघांनाही बलात्काराचा सीन शूट करायचा होता. पण मिथुनने असे काही केले की सुष्मिता संतापून तेथून निघून गेली.
सुष्मिता सेन संतापली..
सुष्मिता आणि मिथुनचा ‘चिंगारी’ हा चित्रपट 2006 साली प्रदर्शित झाला होता. याच्या शूटिंगदरम्यान दोन्ही स्टार्समध्ये मतभेद झाले होते. खरंतर तो शूटचा पहिला दिवस होता आणि पहिल्याच दिवशी बलात्काराचा सीन शूट करण्यात आला होता. या सीनसाठी दोघांनी अनेक रिटेक घेतले आणि जेव्हा फायनल टेक झाला तेव्हा सुष्मिता रडू लागली आणि संतापली. तिने रागाने दिग्दर्शिका कल्पना लाजमी यांच्याकडे जाऊन मिथुनची तक्रार करण्यास सुरुवात केली. शूटिंगदरम्यान मिथुनने तिला अयोग्यरित्या स्पर्श केल्याचा आरोप तिने केला आहे.
मिथुनने अभिनेत्रीची माफी मागितली होती
दिग्दर्शकाने सुष्मिताला समजावून सांगितले की तिचा काहीतरी गैरसमज झाला असावा पण ती ते मानायला तयार नव्हती. आपल्यावरील हा आरोप ऐकल्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांनाही धक्का बसला. मात्र, नंतर मिथुनने सुष्मिताची माफी मागितली आणि त्यानंतरच अभिनेत्रीने पुन्हा शूटिंग सुरू केले.





