सातगाव पठारावर पक्षासाठी ज्वारीचे क्षेत्र खुले

पेठ : सातगाव पठारावर जवळपास साडेपाच हजार हेक्टर ज्वारीचे क्षेत्र शेतकरी पक्षासाठी खुले ठेवले आहे. सातगाव पठारावर बटाटा पिकानंतर ज्वारीचे पीक सर्वत्र घेतले जाते, ज्वात्रीचे क्षेत्र जवळपास साडेपाच हजार हेक्टर एवढे आहे. सातगाव पठार भागातील कोणताच शेतकरी पक्षापासून आपल्या ज्वारीचे राखण करत नाही.
सातगाव पठार भागात पक्ष्यांसाठी खास शेतकऱ्यांची मेजवानी आहे. काही पक्षी शेतातील धान्य खात नसून पिकाची काढणी झाल्यावर शेतात पडलेले दाणे टिपतात. निसर्गातील कीड नियंत्रण आणि सारपटणाऱ्या प्राण्यांचे संतुलन राखण्याचे काम पक्षी करतात.
पिकांचे नुकसान करतात म्हणून अमेरिकेतील लोकांनी कॅरोलविना पॅराकीट या पोपटाच्या सुंदर प्रजातीचा वंशच संपवून टाकला. माओच्या आदेशानंतर चिनी नागरिकांनी लाखो चिमण्यांची कत्तल केली, त्याचा परिणाम शेतीवर झाल्याने चीनला उपासामारीचा सामना करावा लागला. शेवटी चीन सरकारला रशियातून चिमण्या आयात कराव्या लागल्या आहेत.




