Satara : कोयना धरणाचा आपत्कालीन दरवाजा उघडणार ; वाढती जलपातळी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयोग

कोयनानगर : गेल्या ३३ दिवसांपासून कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या सततच्या आणि मुसळधार पावसामुळे धरणातील जलपातळी झपाट्याने वाढली आहे. वाढती जलपातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आज दुपारी १२:०० वाजता आपत्कालीन विमोचक दरवाजा उघडण्यात येणार आहे. ही कारवाई म्हणजे प्रशासनाने जलपातळी नियमनासाठी हाती घेतलेला संयमित, पूर्वनियोजित व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा प्रयोग आहे.
🔹 धरणाची विद्यमान स्थिती (२ जुलै, सकाळी ८:०० वाजता):
* जलपातळी : 2114’01” (644.373 मीटर)
* एकूण साठा : 56.03 टीएमसी (53.24%)
* आवक (Inflow) : 28,179 क्युसेक (2.43 टीएमसी)
* विसर्ग:
* पायथा विद्युतगृह (KDPH): 1050 क्युसेक
* नदी विमोचकाद्वारे (आजपासून): 2676 क्युसेक
एकूण विसर्ग: 3726 क्युसेक
🌧️ पर्जन्यमान (दैनंदिन / एकूण मिमी):
* कोयना : 58 / 1609
* नवजा : 70 / 1394
* महाबळेश्वर : 59 / 1512
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
वाढलेला विसर्ग लक्षात घेता, कोयना नदीच्या काठावर वसलेल्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी कोयना प्रकल्प प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांच्या सूचना गांभीर्याने घ्याव्यात.





