”माझ्या मुलाने मुख्यमंत्री व्हावं..’ दादांच्या आईंच्या इच्छेवर दीपक केसरकर म्हणाले,’अजित पवार अजून लहान’

Ajit Pawar – ‘मुख्यमंत्रीपदाची आशा आणि अपेक्षा असण्यात काही गैर नाही. सध्या एकनाथ शिंदे हे राज्याचे नेतृत्व करत असून त्यांच्याच नेतृत्वात निवडणूक होतील. अजित पवार अजून लहान आहेत. त्यांना पुढच्या काळात संधी मिळू शकते’ असं म्हणत शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी अजित पवार यांच्या मातोश्रींनी त्यांची एक इच्छा बोलून दाखवली.
मतदान करून आल्यानंतर मातोश्री आशाताई पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा व्यक्त केली आहे. याविषयी बोलताना आशाताई म्हणाल्या,“अजित पवार आजारी असून त्यांना अशक्तपणा आला आहे. त्यामुळे ते मतदानासाठी येऊ शकले नाहीत. १९५७ सालापासून मी मतदान करतेय. पूर्वी सुरुवातीला काटेवाडीत काहीच नव्हतं. पण माझ्या सुनेमुळे काटेवाडीत भरपूर बदल झाले”, असे आशाताई पवार यांनी यावेळी म्हटले





