Shiv Sena (UBT) : शिंदेसेना ही भाजपची टेस्ट ट्यूब बेबी; अमित शाहांच्या ‘त्या’ विधानावर उबाठाकडून झोंबणारी टीका
Shiv Sena (UBT) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी कोल्हापूर येथे आयोजित सभेत शिवसेना पक्षाबाबत भाष्य केले होते.

Shiv Sena (UBT) : राज्यात अॅापरेशन टायगर अंतर्गत मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. उबाठाच्या सहा खासदारांना या अॅापरेशनअंतर्गत गळाला लावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पण आता या अॅापरेशनमध्ये मोठा ट्वीस्ट निर्माण झाला आहे. याचे कारण म्हणजे फुटीर खासदारांपैकी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी शिंदेंसोबत जाण्याबाबत निर्णय घेतलेला नाही.
या सगळ्या घडामोडी सुरू असताना काल 20 जून रोजी 20 वर्षानंतर पवनराजे दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा निकाल लागला आणि त्याच दिवशी कोल्हापूरात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटनचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात बोलताना अमित शाह यांनी एक मोठं वक्तव्य केले होते. या वक्तव्यला आता उबाठा गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी कोल्हापूर येथे आयोजित सभेत शिवसेना पक्षाबाबत भाष्य केले होते. आता शिवसेनेत “कोणताही गट उरलेला नाही” आणि शिवसेना “एकच झाली आहे.” असे अमित शाह म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याला उबाठाने सर्वोच्च न्यायालयात अनेक महत्त्वाचे मुद्दे अद्याप प्रलंबित असताना, अमित शाहांनी आधीच निकाल देऊन टाकला आहे. न्यायालयाचा अंतिम निर्णय येण्यापूर्वीच “एकच शिवसेना आहे” असे जाहीर करणे, हा न्यायप्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न असल्याची टीका उबाठाकडून करण्यात आली आहे.
नेमकं काय म्हणाले होते अमित शाह?
“माझ्यासोबत उपस्थित माझे मित्र आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, शिवसेना अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी… आधी शिंदेजींच्या मागे शिवसेना शिंदे गट म्हणावं लागत होतं, आता कोणताही गट उरलेला नाही. एकच शिवसेना झाली आहे.”
उबाठाकडून काय प्रत्युत्तर देण्यात आलं?
“शिवसेना एकच आहे” असे सांगण्याची अमित शाहांना एवढी घाई का? सर्वोच्च न्यायालयात अनेक महत्त्वाचे मुद्दे अद्याप प्रलंबित असताना, अमित शाहांनी आधीच निकाल देऊन टाकला आहे. न्यायालयाचा अंतिम निर्णय येण्यापूर्वीच “एकच शिवसेना आहे” असे जाहीर करणे, हा न्यायप्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न आहे. खरे तर महाराष्ट्राला संपूर्ण सत्य माहिती आहे, शिंदे सेना ही कुठली स्वाभाविक राजकीय चळवळ नाही. ती भाजपची “टेस्ट ट्यूब बेबी” आहे.
“शिवसेना एकच आहे” असे सांगण्याची अमित शाहांना एवढी घाई का?
सर्वोच्च न्यायालयात अनेक महत्त्वाचे मुद्दे अद्याप प्रलंबित असताना, अमित शाहांनी आधीच निकाल देऊन टाकला आहे. न्यायालयाचा अंतिम निर्णय येण्यापूर्वीच “एकच शिवसेना आहे” असे जाहीर करणे, हा न्यायप्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा…— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) June 21, 2026
ती शिवसेना
ज्या पक्षाला स्वतःच्या ताकदीवर शिवसेनेचा सामना करता आला नाही, त्यांनी पक्षफोडीचा मार्ग निवडला. लोकशाही मूल्यांचा आणि बाळासाहेब ठाकरेंनी उभारलेल्या पक्षाचा विश्वासघात करून सत्तेचा खेळ मांडला, असा आरोप उबाठाकडून करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या मनात आजही फरक स्पष्ट आहे ज्यांनी सत्तेसाठी शिवसेना फोडली, ते गट. ज्यांनी संकटातही शिवसेनेशी आणि बाळासाहेबांच्या विचारांशी विकले न जाता निष्ठा ठेवली, ती शिवसेना.
हेही वाचा : Samantha Ruth Prabhu : सामंथा रुथ प्रभु आई होणार? व्हायरल व्हिडीओवरुन चर्चांना उधाण





