Samantha Ruth Prabhu : सामंथा रुथ प्रभु आई होणार? व्हायरल व्हिडीओवरुन चर्चांना उधाण
Samantha Ruth Prabhu : दुसरं लग्न केल्यानंतर समांथा सहा महिन्यांतच गुडन्यूज देणार असल्याची चर्चा

Samantha Ruth Prabhu : दक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभूचा सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यानंतर ती गरोदर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. नुकतीच सामंथाने पती राज आणि चित्रपटाच्या टीमसोबत ‘मा इंति बंगारम’ च्या यशाचा आनंद साजरा करताना दिसली. या क्षणाचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत.
व्हिडीओमध्ये समंथाचा बेबी बंपही स्पष्ट दिसत आहे. दिग्दर्शक राज निदिमोरू यांच्याशी दुसरं लग्न केल्यानंतर समांथाने सहा महिन्यांतच गुडन्यूज दिली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र अद्याप दोघांनीही कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.
Monsoon Update: मान्सून पुन्हा सक्रिय होणार; पुढील 3 ते 4 दिवसांत पाऊस बरसण्याचा अंदाज
व्हायरल व्हिडीओत सर्वांचे लक्ष सामंथा रुथ प्रभुच्या बेबी बंपकडे गेले. सामंथाने फिकट निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि जीन्स परिधान केली होती. गर्दीत राज तिची काळजी घेताना दिसला. ती टीम आणि आपल्या नवऱ्यासोबत केक कापताना दिसत आहे.
View this post on Instagram
मात्र ती गरोदर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. सामंथा रुथ प्रभुच्या या व्हायरल व्हिडीओवर चाहते कमेंट्सचा आणि शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.
समांथा आणि राज निदिमोरू यांनी १ डिसेंबर २०२५ रोजी लग्न करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. याआधी या कपलने एकत्र ‘द फॅमिली मॅन’ आणि ‘सिटाडेल’ या वेब सीरिजसाठी एकत्र काम केलं आहे.
हेही वाचा:





