नेवासा पोलीस ठाण्यात एकामागून एका अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्याची मालिका कायमच सुरु !

राजेंद्र वाघमारे
नेवासा – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या नेवासा शहराची ओळख जगात सातासमुद्रापार पोहचलेली असतांना या पुण्यभूमीतील खाकी?वर्दीवाले पोलीस अधिकाऱ्यांची माञ पैशांच्या मोहापायी पोलीस दप्तरी खाकीवर्दीला डाग लागून येथे नेमणूकीस असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची फडका – फडकी पोलीस मुख्यालयात बदली होवून अधिकाऱ्यांवर बदनामीचा बट्टा लागण्याची जणू काही मालिकाच सुरु झाली की,काय? असा सवाल सध्या नेवासकरांना भेडसवतांना दिसून येत अाहे त्यामुळे गृहखात्याच्या सद् रक्षणाय्… खलनिग्रहणाय् …या ब्रिद वाक्याला येथील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीच्या कारवाईमुळे कलंक लागल्याचे पोलीस दप्तरी असलेल्या नोंदीवरुन ही बाब सप्रमाण सिद्ध होतांना दिसून येत आहे.
नेवासा पोलीस ठाण्यात निरिक्षकपदाची धुरा आपल्यालाच मिळण्यासाठी पोलीस मुख्यालयातून अनेक अधिकारी फिल्डिंग लावण्यात चढाओढ करतात माञ नेवासा पोलीस ठाणे मिळाल्यानंतर खुर्चीवर बसलेला अधिकारी पैशांच्या मोहजाळात अलगद अडकला जात असल्याचे वेळोवेळी पोलीस दप्तरी असलेल्या नोमदीवरुनच ही बाब प्रकर्षाने स्पष्ट होत असून यामुळे पुण्यभूमीचीही बदनामी होत असल्याचे दिसून येत आहे यापुर्वी पोलीसांच्याच प्रसारित झालेल्या अॅडिओ बॉम्बमुळे नेवासा पोलीसांचे कृष्णकृत्यच जनते समोर आलेले आहे नेवासा पोलीस ठाण्यात यापुर्वी निरिक्षक असलेले तत्कालिन पोलीस निरिक्षक रणजित डेरे यांची येथे नेमणूकीस असलेल्या पोलीस शिपायाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना येथे किती पैसा आहे ही माहीती दिली आणि तुम्ही आदेश द्या फक्त अशा संभाषणाची दर्दभरी अॅडिओ क्लिप प्रसारित झाल्यामुळे तत्कालिन पोलीसासह निरिक्षकांची तडकाफडकी मुख्यालयात बदली झाली त्यानंतर येथे विजय करेंची नेमणूक करण्यात आली त्यांचीही वाळूतस्करांच्या संभाषणाची क्लिप प्रसारित होवून मुख्यालयात बदली करण्यात आली त्यानंतर बाजीराव पोवार आले त्यांच्यावरही एका पञकारने साहेबांच्या नावावर पैसे घेतल्याची क्लिप प्रसारित होवून बदली करण्यात आली त्यानंतर आता येथे नेमणूकीस असलेले शिवाजी डोईफोडे यांनी वेठबिगार कामगाराची फिर्याद दाखल न केल्यामुळे विधान परिषदेत लक्ष्यवेधी करण्यात आली त्यामुळे ते सुद्धा बदनामीचा बट्टा लावून मुख्यालयात हजर झाले.
पोलीस पैशांच्या मोहापायी कारवाई होवूनच येथून निघून जाण्याची मालिकाच सुरु झालेली आहे यापुर्वी नेवासा पोलीस ठाण्यासमोरच वाळूतस्करांनी पोलीसांवर गोळीबार करण्याची घटना घडलेली आहे तरी वर्दीतील अधिकारी आणि पोलीसांचा कारभार अद्याप सुधारल्याचे दृष्टिक्षेपात येत नाही त्यामुळे पोलीसांची तर बदनामी येथे होतच असतांना पुण्यभूमीच्या गावालाही कलंक लागत असतांना वरिष्ठ अधिकारी मुग गिळून नेमके का गप आहेत ? असा यक्ष सवालही या निमित्ताने जनतेला सतावत अाहे पोलीसांच्या कारभारात येथे काही केल्या सुधारणा होत नसतांना पैशाच्या मोहापायी येथील पोलीस ठाणे बदनामीच्या संशय कल्लोळात अडकलेले असल्याचे दिसून येत आहे.
नेवासा पोलीस ठाण्याच्या निरिक्षक पदाचा कारभार आता नुकताच धनंजय जाधव यांनी स्विकारलेला आहे नेवासकरांच्या हार सत्कारात ते सध्या व्यस्त बनले आहेत माञ खाकी?वर्दीला लागलेला डाग ते पुसून टाकणार की, पुन्हा वर्दीला डाग लागणार असा खडा सवालही नेवासकरांतून चर्चिला जात आहे.
चौकट
पुढच्याच ठेच मागचा शहाणा ? या ग्रामिण भागातील प्रचलित म्हणीचा प्रत्यय अनेक जण घेत असतांना एकामागून एक पोलीस अधिकारी येथे नेमणूक झाल्यानंतर कलंकित होवूनच जात असल्यामुळे नेवासा पोलीस ठाण्याच्या वर्दीची लक्तरे वेशीला टांगली जात आहेत याचा बोध वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वेळीच घेवून अधिकाऱ्यांच्या कामकाजात सुधारणा करण्याची मागणी जनतेतून केली जात आहे.





