नेवासा पोलिसांनी 24 तासांत चोरीला गेलेली मोटारसायकल शोधली; आरोपींचा शोध सुरू
Updated On:

नेवासा : नेवासा पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी चोरीस गेलेल्या मोटारसायकलचा तपास अवघ्या २४ तासांत लावला आहे. नेवासा फाटा येथील विकास लक्ष्मण रक्ताटे यांची हिरो कंपनीची मोटारसायकल (क्रमांक MH-17-BG-4578) दोन दिवसांपूर्वी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरासमोरून चोरीस गेली होती. याबाबत तक्रार दाखल करण्यात आली.
पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार ज्ञानेश्वर शिंदे, अमोल साळवे, सनी गंगावणे आणि गणेश जाधव यांना तपास करत सुरेगांव रस्त्यावर ही मोटारसायकल बेवारस अवस्थेत ताब्यात घेतली. अज्ञात आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांना अटक केली जाईल, असे पाटील यांनी सांगितले.





