“मेरी जरूरतें कम हैं, इसलिए मेरे जमीर में दम है”; परिविक्षाधिन पोलीस उपाधिक्षक संतोष खाडे

नेवासा : “मेरी जरूरतें कम हैं, इसलिए मेरे जमीर में दम है,” हे ठाम वचन नेवासा पोलीस ठाण्याचे परिविक्षाधिन पोलीस उपाधिक्षक संतोष खाडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. त्यांनी आपल्या कष्टाळू कुटुंबाची आठवण करत, आपल्या संघर्षाची कथा सांगितली. खाडे यांच्या बालपणात आई-वडील ऊसाच्या फडात कष्ट करत होते. त्याच कष्टामुळे ते पोलीस उपाधिक्षक पदापर्यंत पोहोचले.
संतोष खाडे यांनी सांगितले की, “सततच्या गरीबीमुळे आमच्या कुटुंबाच्या गरजा नेहमीच कमीच राहिल्या आहेत, आणि उद्याही कमीच राहतील.” तरीही त्यांनी आपल्या कामात प्रामाणिकपणावर विश्वास ठेवून नेवासा पोलीस ठाण्यात रुजू होऊन समाजात होणाऱ्या वाईट गोष्टींना उघडकीस आणण्याचे ठरवले आहे.
ते म्हणाले, “पहीली खाकी, मग बाकी,” आणि त्यांनी तडजोड न करता अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्धार केला आहे. खाडे यांच्या नेतृत्वाखाली, नेवासा पोलीस ठाण्यात अनेक अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ते पुढे म्हणाले, “गुंडगिरी थांबविणे आणि सज्जनांना सुरक्षित वातावरण देणे हेच माझं मुख्य उद्दीष्ट आहे.”
संतोष खाडे यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करताना पोलिसांना दबावात ठेवून खाकीवर्दीची शान आणि मान वाढविण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांना विश्वास आहे की, “पोलीस कर्मचाऱ्यांचा एकसंध सहकार्य आणि मेहनत यामुळे समाजात सुरक्षा वाढेल.” नेवासा पोलीस ठाण्याच्या यशस्वी कारवाईमुळे संतोष खाडे हे एक उदाहरण ठरले आहेत, आणि खाकीवर्दीने आपल्या शान आणि विश्वासाला वृद्धी दिली आहे.





