‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिका होणार बंद; ईशा केसकरने मागितली चाहत्यांची माफी

Isha Keskar | ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेत्री ईशा केसकरने प्रकृतीच्या कारणास्तव मालिका सोडली. याचा परिणाम मालिकेच्या टीआरपीवर झाला. त्यामुळे ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेतून एक्झिट घेतलेल्या ईशा केसकरने यासाठी प्रेक्षकांची माफी मागितली आहे.
ईशा केसकरने लिहिली भावुक पोस्ट
‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिका बंद होणार असल्याने ईशाने सोशल मीडियावर मालिकेच्या सेटवरील खास आठवणी शेअर केल्या आहेत. या आठवणी शेअर करुन ईशा लिहिते, ”कला… अचानक निरोप घेतल्याबद्दल मनापासून Sorry, तुम्ही प्रेक्षकांनी केलेल्या प्रेमासाठी कायम ऋुणी राहीन… Thank you so much for everything” अशा शब्दात ईशाने पोस्ट लिहिली आहे.
View this post on Instagram
ईशाने मालिका सोडल्यानंतर दोन महिन्यातच ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेला गाशा गुंडाळावा लागला आहे. त्यामुळे ईशाने प्रेक्षकांची माफी मागितली आहे.
ईशाने का सोडली मालिका ?
मालिका सोडल्याचं ईशानं एका मुलाखतीत सांगितले होते की, “सलग दोन वर्ष मी काम करत होते. जून महिन्यापासून माझ्या डोळ्याला फोड आला होता. पण मी तशीच चित्रीकरण करत होते. पण ती दुखापत वाढल्यानं डॉक्टरांनी मला काही दिवस विश्रांती घ्यायचा सल्ला दिला. मी आता विश्रांती घेतली नाही, तर भविष्यात डोळ्यावर छोटी शस्त्रक्रिया करावी लागेल आणि मग मी 15-20 दिवस सूर्यप्रकाशही बघू शकणार नाही.
सारासार विचार करून आणि परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत मी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. मी सप्टेंबरमध्येच मालिका सोडणार असल्याचं टीमला कळवलं होतं. जीवतोड मेहनत करुन आपण पैसे कमावतो पण त्याचा उपभोगच घेता येत नसेल तर काय उपयोग? म्हणून थोडं थांबायचं ठरवलं.” Isha Keskar |
ईशा केसकरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तिला झी मराठीवरील ‘जय मल्हार’ या मालिकेतील बानूच्या भूमिकेने लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिने ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत देखील काम केले. Isha Keskar |
हेही वाचा:





