Tara Sharma : अभिनेता अक्षय खन्ना. या दोन शब्दांच्या नावाने धुमाकूळ घातला आहे. सगळीकडे अक्षय खन्नाची जोरदार चर्चा आहे, त्याला कारण आहे ‘धुरंधर’ हा चित्रपट. ५ डिसेंबर या दिवशी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने बॅाक्स अॅाफिसर धुव्वा केला आहे. चित्रपटातून रणवीर सिंहच्या कमबॅकची चर्चा असतानाच अचानक अक्षय खन्नाने साकारलेल्या रहेमान डकैतची भूमिका भाऊ खाऊन गेली आहे. सोशल मीडियावर अक्षय खन्नाच्या अभिनयाचे कौतुक केले जात आहे. अशातच सोशल मीडियावर एक पोस्ट खास लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. ती पोस्ट दुसरी तिसरी कोणाची नसून अक्षयच्या एक्स गर्लफ्रेंडची आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये 28 वर्षापेक्षा जास्त काळ अक्षयने काम केले आहे. त्याने ‘ताल’, ‘बॉर्डर’, ‘दिल चाहता है’, ‘हमराज’, ‘हंगामा’, ‘हलचल’, ‘रेस’, ‘मॉम’, ‘इत्तेफाक’, ‘दृश्यम 2’, ‘छावा’ आणि आता ‘धुरंधर‘ यासांरख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुनक प्रेक्षकांना दाखवून दिली आहे. आदित्य धर याने दिग्दर्शित केलेल्या धुरंधर चित्रपटातील अक्षयच्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. अक्षय खन्नाच्या दमदार अभियावर त्याची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री तारा शर्माने कौतुक करत एक पोस्ट शेअर केली आहे. View this post on Instagram A post shared by Tara Sharma Saluja (@tarasharmasaluja) ताराने इन्स्टाग्रामवर अक्षयसोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये ताराने “अक्षय तुला शुभेच्छा. आम्ही अजूनपर्यंत चित्रपट बघितलेला नाही. पण आमचं इन्स्टा फीड धुरंधरने भरलेलं आहे. खासकरुन ते गाणं आणि तुझी एन्ट्री. टीमला आणि तुला गुडलक. हा तेच गाणं, स्वॅग आणि औरा…लिंक स्टोरीमध्ये आहे. स्वाईप करं” असे तारा शर्माने पोस्टमध्ये लिहिले आहे. पुढे अभिनेत्री म्हणाली आहे, “आम्ही बालपणापासून एकमेकांना ओळखतो. आजही तू अभिनयाप्रती पूर्णपणे समर्पित आहेस हे पाहून चांगलं वाटतं. आपल्या शाळेच्या नाटकात कदाचित आपल्या सर्वांचा परफॉर्मन्सच्या विश्वात पहिलं पाऊल होतं. तेव्हापासून आम्हाला माहित होतं की, तू हेच करणारं” असे म्हणत ताराने त्याचे कौतुक केले आहेत. वृत्तांनुसार, अक्षय खन्ना आणि तारा शर्मा दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. हेही वाचा : मेस्सी मैदानात आला अन् ‘या’ कारणामुळे चाहते संतापले; थेट बाटल्या अन् खुर्च्या फेकत घातला गोंधळ