Matrubhumi : सलमान खानच्या बहुचर्चेत ‘मातृभूमी’ चित्रपटाचे प्रदर्शन थांबवलं! कारण….
Matrubhumi : अभिनेता सलमान खानच्या बहुचर्चेत मातृभूमी चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. याचे कारण एक दुःखद घटना घडली आहे.

Matrubhumi : अभिनेता सलमान खान अभिनित बहुचर्चेत मातृभूमी (Matrubhumi ) या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे आता चाहत्यांना चित्रपटाच्या रिलीजसाठी काळी काळ वाट पाहावी लागणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून मातृभूमी चित्रपटामुळे सलमान खान चर्चेत आहे. चित्रपटाचे उत्कंठावर्धन पोस्टर आणि टीझरही प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा चित्रपट एप्रिल महिन्यात रिलीज करण्यात येणार होता. मात्र, एक अत्यंत दुःखद घटना घडल्याने चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.
या चित्रपटावर काम करत असलेले अभिनेते-गायक प्रशांत तामांग यांचे निधन झाले आहे. ते या चित्रपटात अत्यंत महत्वाची भूमिका साकारणार होते. मात्र, त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले आहे. त्यामुळे मातृभूमी चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. Matrubhumi
हेही वाचा : How Ho Increase Hemoglobin: शरीरात रक्ताची कमतरता आहे? या घरगुती आहाराने वाढवा हिमोग्लोबिन
प्रशांत तामांग यांच्या निधनामुळे चित्रपटाच्या टीमवर शोककळा पसरली आहे. प्रशांत तामांग इंडियन आयडल ३ चा विजेता आहे. त्यासोबत त्याने अनेक दर्जेदार वेबसिरीजमध्ये काम केले आहे. यामध्ये ‘पाताल लोक 2’ चा आर्वजून उल्लेख केला जातो. याशिवा तो नेपाळी चित्रपटसृष्टी आणि म्युझिक व्हिडिओसाठी एक प्रसिद्ध चेहरा होता.

Matrubhumi : सलमान खानच्या बहुचर्चेत ‘मातृभूमी’ चित्रपटाचे प्रदर्शन थांबवलं!
मातृभूमी हा चित्रपट अभिनेता सलमान खानचा महत्वाचा चित्रपट आहे. या चित्रपटातील अॅक्शन सीनसाठी त्याने कठोर मेहनत घेतली आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री चित्रांगदा महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट 15 अॅागस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या मुहूत्वार प्रदर्शित होऊ शकतो, अशी चर्चा आहे. चित्रपटाची शूटिंग सध्या सुरू आहे. येत्या काही महिन्यांमध्ये ‘पोस्ट-प्रॉडक्शन’चे काम सुरू होईल. Matrubhumi
2020 मधील भारत आणि चीन यांच्यातील ‘गलवान संघर्ष’ यावर आधारित चित्रपटाची कथा असणार आहे. या चित्रपटाचे मूळ नाव बॅटल ऑफ गलवान असे होते. मात्र, निर्मात्यांनी अलीकडेच चित्रपटाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आणि मातृभूमी असे नवीन नाव चित्रपटाला देण्यात आले आहे. Matrubhumi





