Daisy Shah : ज्या चित्रपटाला दिला होता नकार, तोच ठरला सुपरहिट!
Daisy Shah : सलमान खानचे अनेक बिग बजेट चित्रपट हिट ठरले आहेत. हिट ठरलेल्या चित्रपटांची यादी मोठी आहे.

Daisy Shah : अभिनेत्री डेझी शाहने ‘जय हो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, या चित्रपटापूर्वी तिला सलमान खानच्या एका मोठ्या चित्रपटाची अॅाफर नाकारली होती. याविषीयी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत डेझीने सविस्तर भाष्य करत खुलासा केला.
सलमान खानचे अनेक बिग बजेट चित्रपट हिट ठरले आहेत. हिट ठरलेल्या चित्रपटांची यादी मोठी आहे. या यादीत बॅाडीगॅार्ड चित्रपटाचा समावेश होतो. करिना कपूर खान या चित्रपटात मुख्य भूमिकेत होती. (Daisy Shah)
डेझी शाहला याच चित्रपटात काम करण्यासाठी सलमान खानकडून विचारणा करण्यात आली होती. पण डिझीने चित्रपटात काम करण्यास नकार कळवला होता.
‘बॅालिवूड बबल’ला दिलेल्या डेझीने सांगितले की, ‘बॉडीगार्ड’ चित्रपट नाकार दिल्यानंतर सलमान खान काही मिनिटे पूर्णपणे शांत झाला होता. “मी त्याला काम करण्यासा नकार दिल्यानंतर खोलीत जवळपास पाच ते सात मिनिटे शांतता होती. ती वेळ मला खूप मोठी वाटत होता. मी मनात सतत म्हणत होते, ‘काहीतरी बोल ना.’ अखेर त्याने फक्त एकच शब्द उच्चारला ‘ठीक आहे.”
दीड वर्षानंतर सलमानने पुन्हा डेझीशी संपर्क साधला आणि तिला ‘जय हो’साठी ऑडिशन देण्यास सांगितले. अखेरीस तिला ती भूमिका मिळाली आणि २०१४ मध्ये तिने जय हो चित्रपटात सलमान खानसोबत स्क्रिन शेअर केली. या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट बॅाक्स अॅाफिसवर फारशी काही कमाल करू शकला नाही, हे गोष्टी वेगळी.
सलमान खानच्या स्वभावाबद्दल बोलताना डेझीने त्याचे कौतुक केले. “तो इंडस्ट्रीतील सर्वात काळजी घेणाऱ्या लोकांपैकी एक आहे. सेटवर असो किंवा वैयक्तिक आयुष्यात, तो आपल्या जवळच्या लोकांची कायम काळजी घेतो,” असे डेझी म्हणाली. (Daisy Shah)
अभिनेत्री होण्यापूर्वी डेझी शाह नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य यांच्याकडे सहाय्यक नृत्यदिग्दर्शक म्हणून काम करत होती. त्यानंतर तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि अनेक गाण्यांमध्ये काम केले. यानंतरच सलमान खानने तिला ‘बॉडीगार्ड’साठी विचारणा केली होती, पण डेझीने त्याला नकार दिला. त्यानंतर ‘जय हो’मध्ये तिला मुख्य भूमिका मिळाली. त्यानंतर ती फारशी चित्रपटात दिसली नसली तरी आयटंम साँगमुळे सतत चर्चेत असतं.






