Salman Khan : सलमान खानच्या चित्रपटाचे नाव अचानक का बदललं? दिग्दर्शकाने केला खुलासा
Salman Khan : सलमानच्या आगामी सिनेमाचं नाव आता ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ असणार आहे.

Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या आगामी प्रोजेक्टमुळे चर्चेत आहे. त्याच्या ‘बॅटल ऑफ गलवान’ या सिनेमाच्या नावात मोठा बदल करण्यात आला आहे.
सलमानच्या या आगामी सिनेमाचं नाव आता ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ असणार आहे. नुकतंच या चित्रपटाच्या नव्या पोस्टरसह नवीन शीर्षकाची घोषणा केली. मात्र, अचानक हा बदल का करण्यात आला. याबद्दल अनेकांना प्रश्न पडला होता.
आता या चित्रपटाचे नाव बदलण्यामागचे कारण चित्रपटाचे दिग्दर्शक अपूर्व लाखिया यांनी सांगितले आहे. ते म्हणाले, सलमानच्या चाहत्यांना कदाचित असा प्रश्न पडेल की हे असं का केलं? पण हा एका रात्रीत घेतलेला निर्णय नव्हता. सुरुवातीलाच, आम्ही ‘बॅटल ऑफ गलवान’ आणि ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ ही दोन टायल्स आम्ही रजिस्टर केली होती.
चित्रपट बनवण्याच्या प्रवासादरम्यान, आम्हाला जाणवलं की हा चित्रपट केवळ एका लढाईबद्दल नाही तर तो मानवता, सहानुभूती देखील दर्शवतो. ही आपल्या सैनिकांच्या शौर्याची आणि लढाईची कहाणी आहे.
“‘मातृभूमी में वॉर रेस्ट इन पीस’ हे नाव भावना आणि त्याग अधिक प्रभावीपणे व्यक्त करतं. त्याशिवाय ‘मातृभूमी’ नावाचे एक गाणेसुद्धा चित्रपटात आहे. हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांकडून गाण्याला चांगलाच प्रतिसाद मिळाला. या प्रतिसादामुळेच ‘मातृभूमी’ नाव अधिक योग्य वाटले.”
View this post on Instagram
“याशिवाय सलमान खानला चित्रपटाचे नाव बदलण्याचा आणि चीनविरोधी सीन्स कमी करण्याचा सल्ला देण्यात आला होता. सलमानने हा सल्ला गांभीर्याने घेत चित्रपटात काही महत्त्वाचे बदल केले आहेत. Salman Khan :
या बदलांमुळे चित्रपटातील काही सीन पुन्हा चित्रित करावे लागले. त्यामुळे निर्मिती खर्चही वाढला. पण सलमानने त्याचा विचार न करता, चित्रपट भावनिक आणि देशभक्तीवर आधारित बनवण्यावर भर दिला,” असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, चित्रपटाच्या नवीन पोस्टरमध्ये सलमान खान रक्ताने माखलेल्या आणि जखमी अवस्थेत दिसत आहे. काट्यांच्या तारा गुंडाळलेला एक खांब तो स्वतःवर आदळण्यापासून रोखताना दिसत असून, त्यावर ‘मातृभूमी’ हे नवीन नाव ठळकपणे दिसत आहे. हा चित्रपट जुलै ते ऑक्टोबर २०२६ दरम्यान प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. यात सलमानबरोबर अभिनेत्री चित्रांगदा सिंग मुख्य भूमिकेत आहे. Salman Khan :
हेही वाचा:





