Gold and Silver Prices : आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम जगातील विविध क्षेत्रांवर पडताना दिसत आहे. सोने आणि चांदी यांच्या भावात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण होत आहे. गुढीपाडवाच्या शुभमुहूर्तावर देशभरात सोन्याच्या दरांत मोठी घसरली झाली होती. त्यामुळे नवीन वर्षाच्या शुभमूहर्तावर सोनं घेणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. ही घसरण अजूनही कायम असून, आजही सोने आणि चांदीचे दर घसरले आहेत. शुक्रवारी सोन्याच्या भावात 7 हजारांची घसरण झाली होती. आज शनिवारी सुद्धा सोन्याचे भाव जवळपास पंधरासे रुपयांनी घसरले आहेत. Gold and Silver Prices हेही वाचा : Chhagan Bhujbal : राजकीय वर्तुळात खळबळ! कॅप्टन खरात प्रकरणावर भाष्य करताना छगन भुजबळांचा मोठा खुलासा “आपल्याही काही लोक ..” सोन्याचा भाव किती? Gold and Silver Prices Goodreturns च्या आकडेवारीनुसार, आज सकाळी 10.30 वाजता राज्यातील मुंबईसह इतर शहरांमधील सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,48,900 रुपये इतका आहे. तर प्रति ग्रॅमचा भाव 14,890 इतका आहे. घसरणीचा भाव पाहता मागील 10 दिवसांत सोन्याचा भाव वधारला असल्याचे दिसते. Gold and Silver Prices Gold and Silver Rate Prices : सोन्याच्या भावात घसरण कायम! चांदीचा भाव किती? जाणून घ्या महाराष्ट्रातील आजचे ताजे दर Goodreturns च्या आकडेवारीनुसार, आज दिल्ली, मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, जळगाव आदी शहरांमध्ये चांदीचा भाव प्रति किलो 2,54,900 रुपये इतका आहे. सोने आणि चांदीचा भाव घसल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. Gold and Silver Prices गेल्या 21 दिवसांपासून अमेरिका, इस्राइल विरुद्ध इराण यांच्यातील युद्धामुळे जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे सोने आणि चांदीच्या भावात कधी वाढ तर कधी घसरण होताना पाहायला मिळत आहे. हेही वाचा : Pune Crime News: कोंढव्यात टोळक्यांकडून मारहाण अन् वाहनांची तोडफोड; दहशत माजविणाऱ्या गुंडांचा खाकी वर्दीने उतरवला माज