Nagar | आ.कानडेंच्या काळातील कामांचा दर्जा निकृष्ट

श्रीरामपूर, (प्रतिनिधी)- सन २०१९ ते २०२४ या कालावधीत आमदार लहू कानडे यांच्या स्थानिक विकास निधीतून व राज्य शासनाच्या विविध योजनेंतर्गत श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत झालेली विकास कामे अतिशय निकृष्ट दर्जाची झालेली आहे.
सदर विकास कामाची क्वाॅलिटी कंट्रोलमार्फत समिती नेमणूक करून चौकशी करण्यात यावी. तसेच संबंधित जबाबदार नातेवाईक अधिकारी व ठेकेदारांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशा मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस हेमंत ओगले यांनी केली.
जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने हेमंत ओगले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांतअधिकारी कार्यालयात आमदार लहू कानडे यांचे सन २०१९ ते २०२४ अखेर या कालावधीतील आमदार निधी व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या कामाचा दर्जा तपासणी करणे बाबत या मागणीसाठी प्रांतअधिकारी किरण सावंत पाटील यांना निवेदन देण्यात आले.
ओगले यांनी निवेदनात म्हटले आहे की , मतदारसंघातील अनेक नागरिकांची तक्रार आहे की, पहिल्याच पावसात संपूर्ण रस्ते खराब झाले आहे.
ते टिकले पण नाही. नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या परंतु सार्वजनिक बांधकाम उपविभाग श्रीरामपूर येथे आमदारांचे नातेवाईक अधिकारी पदावर असल्याने त्यांची कोणतीही चौकशी व दखल घेण्यात आली नाही.
सन २०१९ ते २०२४ अखेर या कालावधीतील स्थानिक विकास निधी व राज्य शासनाच्या विविध योजनेच्या कामाचा दर्जा तपासून संबंधित ठेकेदार व अधिकारी यांचेवर कारवाई करावी, अशी मागणी प्रांताधिकारी सावंत पाटील यांना करण्यात आली. ]
यावेळी शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, आशिष धनवटे, राजू चक्रनारायण, विलास दाभाडे, मोहन रनणवरे, सुनील साबळे, अशोक जगधने, रणजीत जामकर, संदीप शिरसाठ, सुरेश बनसोड, बाबा वायदंडे , योगेश गायकवाड, लक्ष्मण शिंदे, कल्पेश पाटणी, गोपाल भोसले, सोमनाथ उदमले ,
प्रवीण नवले, नवाज जहागिरदार, सनी मंडलिक, रितेश एडके ,जमील शहा, राजेश जोंधळे, रावसाहेब आल्हाट, तीर्थराज नवले , शाहरुख शेख, भोला दुगल, सागर दुपाटी, खंडेराव सदाफळ, अमोल शेटे, सरबजीतसिंग चुग, भगवान जगधने, पुंडलिक खरे, नितेश चव्हाणके ,वैभव कुऱ्हे आदी उपस्थित होते.





