पेट्रोलिंगमध्ये सापडली पर्स ; महिलेचा शोध घेऊन दिली परत
Updated On:

पुणे – पेट्रोलिंग करताना सापडलेली पर्स व मोबाईल मुळ मालक महिलेस परत केला. पर्समध्ये सापडलेली माहिती व मोबाईलवरुन कॉल करुन माहिती घेत महिलेला चौकीत बोलावून तीच्या ताब्यात ऐवज देण्यात आला. समर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई निलेश साबळे यांनी ही कार्यवाही केली.
पोलीस शिपाई निलेश साबळे यांना नानापेठेतील अशोक चौकात एक लेडीज पर्स सापडली. त्यामध्ये मोबाईल व इतर मौल्यवान ऐवज होता. त्यांनी ही पर्स नानापेठ पोलीस चौकीतील सहायक पोलीस निरीक्षक खोपडे यांच्याकडे दिली. पोलीस हवालदार विजय कदम व शिपाई निलेश साबळे यांनी मोबाईलमधील नंबरवरुन महिलेची माहिती काढली. यानंतर तीच्याशी संपर्क साधून पर्स व मोबाईल परत दिला.





