चेन्नई विमानतळावर उतरताना विमानाचा टायर फुटला, प्रवाशी सुखरूप
Updated On:

चेन्नई : चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना विमानाचा टायर फुटला. विमानाने मस्कतहून १४६ प्रवाशांना आणले होते. प्रवासी सुखरूप असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
असे सांगण्यात आले की, मस्कतहून येणारे विमान चेन्नई विमानतळावर नुकतेच उतरले असता त्याचा मागचा एक टायर फुटला. त्यामुळे विमानातील प्रवाशांमध्ये घबराट पसरली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, विमानाचा परतीचा प्रवास रद्द करण्यात आला असून सर्व प्रवाशांना शहरातील विविध हॉटेल्समध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.





