Colombia Military Plane Crash : मोठी दुर्घटना ! कोलंबियामध्ये लष्कराचे मालवाहू विमान कोसळले
कोलंबियाच्या नैऋत्येकडील भागात लष्कराचे मालवाहू विमान कोसळल्याने (Colombia Military Plane Crash) किमान ६६ जण ठार झाले आहेत.

Colombia Military Plane Crash : कोलंबियाच्या नैऋत्येकडील भागात लष्कराचे मालवाहू विमान कोसळल्याने (Colombia Military Plane Crash) किमान ६६ जण ठार झाले आहेत. तर अन्य ७७ जण जखमी झाले आहेत, असे कोलंबियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
हा अपघात (Colombia Military Plane Crash) कोलंबियाच्या पुटुमायो या प्रांतात पुएर्टो लेग्युझामो या दुर्गम भागातील महापालिकेच्या हद्दीत घडला. हा भाग पोरू आणि इक्वाडोरच्या सीमांना लागून आहे.
घटनास्थळी धुराचे काळे लोट उठत असल्याचे काही फोटो कोलंबियातल्या माध्यमांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या हर्क्युलस सी-१३० विमानात ११४ प्रवासी आणि ११ कर्मचारी असे १२५ जण होते, असे कोलंबियाच्या हवाई दलाचे कमांडर कार्लोस फेर्नांडो यांनी व्हिडीओ संदेशात म्हटले आहे.
विमानातील ७७ जणांना वाचवण्यात आले असून इतरांना विमानातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे हवाई दलाने स्वतंत्रपणे प्रसिद्धीस दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. एकूण ११० सैनिकांना पुटुमायो प्रांतातल्या एका अन्य शहरात नेले जात असताना हा अपघात घडला.
विमानाने विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर दोन किलोमीटर अंतरावर असताना ते कोसळले. विमानात तांत्रिक बिघाड झाला असल्याचा संशय आहे. पण त्याबद्दल आताच काहीही सांगता येऊ शकत नाही, असे हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जखमींवर उपचारांसाठी ७४ खाटा घेऊन दोन विमाने घटनास्थळी रवाना करण्यात आली आहेत.
जखमींना तेथून राजधानी बगोटा येथे आणले जाणार आहे. कोलंबियाचे (Colombia Military Plane Crash) अध्यक्ष गुस्ताओ पेट्रो यांनी या सारखी गंभीर दुर्घटना व्हायला नको होती, अशी प्रतिक्रिया दिली आहे. देशातील विमानांचे आणि लष्करी उपकरणांचे आधुनिकीकरण करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.






