US-Iran War: आखातातील युद्धामुळे बर्याच शहरात भारतीय नागरिक अडकून पडले आहेत. त्यांना परत आणण्याचा प्रयत्न नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि विमान कंपन्या करीत आहेत. इंडिगो कंपनीने जाहीर केलेल्या माहितीनुसार या कंपनीने जेद्दाहकडे चार विमाने आणि मस्कतकडे एक विमान रवाना केले आहे. परिस्थिती पाहून आगामी काळात या विमान सेवाच्या माध्यमातून अडकलेल्या नागरिकांना परत आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. भारतीय नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि संबंधित देशातील नागरी विमान वहतूक मंत्रालयाशी समन्वय साधून या सेवा जास्तीत जास्त प्रमाणात चालू ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. चार मार्च रोजी या विमानाची संख्या परिस्थितीचा काळजीपूर्वक आढावा घेऊन आणखी वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. हेही वाचा – जमिनीवर सैन्य उतरवणार? ट्रम्पनी दिला धक्कादायक इशारा; इराणची नेव्ही, एअरफोर्स, लीडरशिप, सगळं संपलं! ज्या भागात युद्धाचा कमी परिणाम झाला आहे अशा शहरातून या सेवा उपलब्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. विविध देशाच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाशी संपर्क साधल्यानंतर मुस्कत व जेद्दाह येतील विमानसेवा उद्यापासून अंशतः सुरू करण्यात येतील. त्याचबरोबर युरोपातील अथेन्स येथेही या विमानसेवा सुरू करण्यात येतील. विमानांचे संख्या 13 राहणार असून 26 वाहतूक क्षेत्रात या सेवा उपलब्ध होऊ शकणार आहेत. 4 मार्च रोजी संयुक्त अरब अमिरातीलकडेही या सेवा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. मात्र परिस्थिती बदलत आहे. या परिस्थितीचा अभ्यास करून सुरक्षिततेला सर्वात जास्त प्राधान्य देऊन या सेवा सुरू करण्याचा निर्णय नंतर घेतला जाईल असे सांगितले जाते. संबंधित देशाबरोबर चर्चा करून जास्तीत जास्त विमानांची सेवा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे जेणेकरून अडकलेले नागरिक शक्य तितक्या लवकर सुरक्षितरित्या देशात परंतु शकतील. यासंदर्भातील ताज्या घडामोडीची माहिती इंडीगो कंपनीच्या वेबसाईटवर आणि समाज माध्यमावर उपलब्ध आहे. त्याचा वापर प्रवाशांनी करावा असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवाशांच्या किंवा कर्मचार्यांच्या सुरक्षिततेला बाधा न पोचता या सेवा सुरू करण्याचा प्रयत्न चालू आहे. इतर विमान कंपन्याही अशा प्रकारची सेवा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात करीत असल्याचे सांगण्यात आले.