Sonali Kulkarni : विमानात महिलेच्या ‘त्या’ कृत्यावर सोनाली कुलकर्णी संतापली
Sonali Kulkarni : सोनाली कुलकर्णीने व्हिडिओमध्ये म्हटले की, "मी नुकतीच फ्लाईट मधून उतरले. माझा स्टाफ माझ्या बॅग्स घेऊन येत आहे तोपर्यंत मला तुमच्या सोबत एक गोष्ट शेअर करायची आहे.

Sonali Kulkarni : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonali Kulkarn)विमान प्रवासादरम्यान घडलेल्या एका अनुभवाबाबत सांगितले आहे. लहान मुलांना प्रवासादरम्यान अनेकदा त्रास होतो.
त्यावेळी मुले रडतात मात्र अशावेळी काही पालक समजून घेण्यापेक्षा चिडचीड करताना दिसतात आणि थेट मुलांवर हात उचलतात. असाच प्रकार विमान प्रवासादरम्यान घडल्याने सोनालीने याबाबतचा व्हीडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Sonali Kulkarni )
सोनाली कुलकर्णीने व्हिडिओमध्ये म्हटले की, “मी नुकतीच फ्लाईट मधून उतरले. माझा स्टाफ माझ्या बॅग्स घेऊन येत आहे तोपर्यंत मला तुमच्या सोबत एक गोष्ट शेअर करायची आहे. मी ज्या फ्लाईटने आले, तिथे एक लहान बाळ होतं जे सव्वा वर्षांचं वगैरे असेल. त्या बाळाच्या आई-बाबांनी त्या बाळाला दोन सीटच्या मध्ये बेल्ट लावून बसवलं होतं. Sonali Kulkarni
View this post on Instagram
ते बाळ भरपूर रडत होतं…. मला असं वाटतंय की त्या बाळाचे कान दुखत होते. म्हणून मी मागे वळून त्यांना विचारलं की काही मदत हवी आहे का? मी घेऊ का बाळाला थोडा वेळ कडेवर ? बाळाला थोडं शांत करते. यावर त्याची आई थोडी ओशाळली. मला म्हणाली की नाही नाही
मग मी त्यांना म्हटलं की त्याला निदान कडेवर तरी घ्या कारण एकतर ऑफ आणि लँडिंग दोन्ही होत नव्हतं. आम्ही हवेत होतो त्यावेळी. मग त्या बाईने आपल्या बाळाला कडेवर घेतलं. पण ते बाळ पुन्हा रडायला लागलं तेव्हा त्या बाईने त्याला जवळपास थप्पडच मारली आणि त्याला दाबायचा प्रयत्न केला. Sonali Kulkarni
तर अशावेळी तुम्ही ओशाळून जाऊ नका, आपल्या मुलांना कधी कधी त्रास होत असतो. त्यांना शब्दात मांडता येत नाही. विमान टेक ऑफ झाल्यावर कधी कधी माणसांचा कान दुखतो. होत असेल त्या बाळाला त्रास काहीतरी. आपण मदत मागायला पाहिजे. त्या बाळाला शिक्षा देऊन काय उपयोग आहे?” असे म्हणत सोनालीने शेवटी तुम्हाला काय वाटतं असंही विचारलं आहे. Sonali Kulkarn
सोनाली कुलकर्णीच्या (Sonali Kulkarni ) या व्हिडिओवर “तू बरोबर म्हणतेय, बिचारं बाळ,” अशी कमेंट क्रांती रेडकरने केली आहे. याशिवाय अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हेही वाचा:





