विमान कसं चालवायचं हेच पायलट विसरले

वाशिंग्टन –करोना महामारीच्या काळामध्ये अमेरिकेतील विमान सेवा मोठ्या प्रमाणात ठप्प झाल्याने विविध विमान कंपन्यांमध्ये काम करणारे पायलट विमान कसे चालवायचे हेच आता विसरून गेले आहेत. त्यामुळे या पायलटसाठी पुन्हा एकदा ट्रेनिंग सुरू करण्यात आलेआहे.
महामारीच्या पहिल्या टप्प्यामध्ये अमेरिकेतील विमान सेवा ठप्प झाली होती. त्यानंतर जेव्हा-जेव्हा परिस्थिती सुधारणा झाली तेव्हा विमान सेवा सुरू करण्यात आली विमान कंपन्यांनी आपल्या पायलट लाकामावर बोलवले पण आता अनुभवी पायलटही विमान चालवताना चुका करत असल्याचे लक्षात आल्याने ही बाब विमान कंपन्यांनी गांभीर्याने घेतली असून सर्वच पायलटचे आता ट्रेनिंग केले जाणार आहे.
आता पर्यंत ज्या चुका पायलटने कधीच केल्या नव्हत्या अशा प्रकारचा चुका पायलट विमानचा लवताना करत असल्याचे लक्षात आल्याने विमान कंपन्यांनी ती बाबगांभीर्याने घेतली एका पायलटला विमान जमिनीवर व्यवस्थित उतरवता आले नाही दुसरा एक पायलट विमानातील एक महत्त्वाची यंत्रणा सुरू करण्याचे विसरून गेला अशा अनेक घटना समोर आल्या आहेत.
विमान चालवणे हा सरावाचा अन एका प्रक्रियेचा भाग असल्याने जर पायलटच्या या सरावा मध्ये खंड पडला आणि विमान चालवण्याच्या तो प्रक्रिये पासून ते दीर्घकाळदूर राहिले तर अशा प्रकार च्या घटना घडू शकतात असे तज्ञांचे म्हणणे आहे.
पण पायलटच्या अशा चुका प्रवाशांच्या जिवावर बेतण्याची शक्यता असल्याने अमेरिकेतील सर्वच विमान कंपन्यांनी आता नजीकच्या कालावधीत सर्व पायलटला पुन्हा एकदा ट्रेनिंग देण्याचा निर्णय घेतला आहे.





